लखनऊ : वंचित अल्पवयीन मुलीसोबत नखे कापण्याच्या बहाण्याने ५० वर्षीय मुख्यध्यापकाने अश्लील कृत्य केले. ही घटना उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडली आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या पीडित विद्यार्थ्याीनीचे वय हे ११ असून ती इयत्ता चौथीत शिकत होती. याप्रकरणातील मुख्यध्यापक जमाल कामील हा कट्टरपंथी असून लोकांनी त्याला बेदम मारहाण केली. ही घटना २३ ऑगस्ट रोजी घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेरठ जिल्ह्यातील मवाना पोलीस ठाणे हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला. एका अनुसूचित जाती जमातीच्या अल्पवयीन मुलीवर सरकारी शाळेचा कट्टरपंथी मुख्यध्यापक जमाल कमील यांनी अश्लील चाळे केले. मुख्यध्यापक विद्यार्थ्यांची नखे तपासत होता. याप्रकरणाची तक्रार पीडित महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात केली. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, तिची मुलगी मवाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकारी शाळेत शिक्षण घेत होती. त्यावेळी मुख्यध्यापक जमाल कमील विद्यार्थ्यांची नखे तपासत होता. यावेळी पीडितेची पाळी आल्यानंतर तिची नखे तपासण्यात आली. त्यानंतर तिला एका बंद खोलीत नेण्यात आले होते.
त्यावेळी मुख्यध्यापकाने तिची नखे पाहत तिचा सलवार खोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित विद्यार्थीनीने हात जोडून हा प्रकार करण्यास विरोध केला. ही माहिती पीडितेच्या कुटुंबियांना समजताच त्यांनी पी़डितेच्या शाळेत धाव घेतली होती. त्यावेळी कुटुंबियांसोबत आजूबाजूला राहणारी लोकं घटनास्थळी पोहोचली. यावेळी मुख्यध्यापकाला मारहाण करण्यात आली असून मारहाण केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. याप्रकरणात पोलिसांनी आरोपी जमाल कमीलला अटक केली आहे.
तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आरोप होता की, आरोपी मुख्यध्यापक विद्यार्थ्यांना आपली मालीश करायला सांगत असे. मवाना डेप्युटी एसपी सौरभ सिंह यांनी या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवाला असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणात जमाल कमील यांच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.