टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्ती

24 Aug 2024 15:26:27
shikhar dhawan retired all forms of cricket


मुंबई :       भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवनने टीम इंडियाकरिता सलामीवीर म्हणून प्रतिनिधित्व करताना ४४.११ च्या सरासरीने ६ हजार ७९३ धावा केल्या. तर दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये ४०.६१ च्या सरासरीने २ हजार ३१५ धावा केल्या आहेत. शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपली भूमिका जाहीर केली आहे.

तो म्हणाला, २०१० मध्ये विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि आता एक समाधानी माणूस म्हणून निवृत्त होत आहे, असे शिखर धवनने म्हटले आहे. मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय बंद करत आहे पण माझ्यासोबत माझ्या असंख्य आठवणी आहेत आणि मी खूप आभारी आहे, असेही तो म्हणाला.

तो म्हणाला, “आयुष्यात पुढे जाण्यासाठी पाने उलटणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे. मी इतके दिवस भारतासाठी क्रिकेट खेळलो म्हणून मी माझ्या अंतःकरणात शांततेने निवृत्त होत आहे, अशा भावना शिखर धवनने यावेळी व्यक्त केल्या आहेत. धवनने भारतासाठी ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ टी-20 सामने खेळले आहेत.



Powered By Sangraha 9.0