अ. भा. म. ना. परिषद, नवी मुंबई आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता उद्या होणार

24 Aug 2024 15:08:22

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद  
 
नवी मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सांस्कृतिक महोत्सवाची’ सांगता उद्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार आहे. या कार्यक्रमाला २२ ऑगस्ट पासून सुरुवात झाली होती. २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी नवी मुंबईतील विविध सभागृहांमध्ये विविध कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. २२ ऑगस्ट रोजी गणेश वंदना आणि नांदी, एकपात्री नृत्य नाटिका, एकपात्री अभिनय, कै. सुरेश लाड स्मृती उजाळा, एकपात्री अभिनय, मंगळागौर, सुरेल संगीत, छत्रपती शिवायन आणि २३ ऑगस्ट रोजी कराओके संगीत, कविता वाचन, एकपात्री अभिनय, कविता सादरीकरण, अभिवाचन, नाट्य संगीत, एकपात्री अभिनय, बुरगुंडा, भरतनाट्यम, कथाकथन, लावणी, सुगम संगीत, स्वरांजली असे विविध कलाप्रकार सादर झाले. २४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता नाट्यदिंडी काढण्यात आली आणि त्यानंतर ‘काय ते जाणावे’ (बालनाट्य), मन (दीर्घांक), नवस (एकांकिका), आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ (दोन अंकी नाटक), आंग्रु डुंग्रू (आगरी भाषेतील हास्य कविता), महाराष्ट्राची लोकधारा इत्यादी कार्यक्रम सादर झाले. २५ ऑगस्ट रोजी सांगता कार्यक्रमात १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, माजी अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, खासदार नरेश म्हस्के, नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त कैलास शिंदे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष(उपक्रम) भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष (प्रशासन) नरेश गडेकर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कोषाध्यक्ष सतीश लोटके, संमेलन समिती प्रमुख विजय चौगुले उपस्थित असणार आहेत. या सांगता समारंभात अशोक हांडे लिखित आणि दिग्दर्शित ‘मराठी बाणा’ हा कार्यक्रम होणार आहे.
Powered By Sangraha 9.0