जय जय रघुवीर समर्थ

24 Aug 2024 13:26:12
 
Raghuveer
 
वयाच्या अवघ्या सातव्या-आठव्या वर्षांत विश्वाची चिंता करणार्‍या समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा चरित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. निलेश कुंजीर दिग्दर्शित आणि विक्रम गायकवाड अभिनित ‘रघुवीर’ या चित्रपटात रामदास स्वामींचे संपूर्ण आयुष्य मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने ‘रघुवीर’च्या संपूर्ण टीमसोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला सुसंवाद.
 
स्वामींचं जीवन दोन तासांत मांडणं म्हणजे...
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा चित्रपट तयार करावा, हे कसे सूचले, याबद्दल बोलताना दिग्दर्शक निलेश कुंजीर म्हणाले की, “समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित आजवर एकही चित्रपट आला नव्हता. त्यामुळे स्वामींचे विचार आजच्या २१व्या शतकात समाजापर्यंत पोहोचावे, नव्या पिढीला समर्थ रामदास स्वामी कोण होते, हे समजावे, यासाठी ‘रघुवीर’ या चित्रपटाचा घाट घातला. आता इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट करणं ही सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठी अभ्यास, संशोधन हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचसाठी आम्ही सज्जनगडावर गेलो. तेथील लोकांनी आम्हाला मदत केली. साहित्य, पुस्तकं देऊ केली आणि त्यातून अभ्यास करत आम्ही चित्रपटाची कथा लिहिली. अभिराम भडकमकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कारण, केवळ दोन तासांच्या चित्रपट वेळमर्यादेत स्वामींचं जीवन दाखवणं फार अवघड आहे. मग, आम्ही विचार करून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, घटना आणि आजच्या जगाशीदेखील त्यांचे कोणते आचारविचार मिळतेजुळते आहेत, त्याची छाटणी केली आणि त्यानुसार कथा बांधत गेलो.”
 
...म्हणूनच विक्रम यांची निवड
‘रघुवीर’ या चित्रपटात समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका अभिनेते विक्रम गायकवाड यांनी साकारली आहे. त्यांची या व्यक्तिरेखेसाठी निवड कशी झाली, याबाबत बोलताना दिग्दर्शक निलेश कुंजीर म्हणाले की, “ज्यावेळी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर चित्रपट करायचे ठरवले होते, तेव्हाच स्वामींच्या भूमिकेसाठी विक्रम यांची निवड मी केली होती. पण, मला निर्मात्यांनी विक्रमच का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी त्यांना रामदास स्वामींच्या रूपात विक्रम कसे दिसतील, याचं स्केच काढून दाखवलं आणि त्यांनाही ते पटलं आणि मग या भूमिकेसाठी विक्रम यांची वर्णी लागली.”
 
पहिल्यांदा रामदास स्वामींच्या रूपात पाहिलं तेव्हा...
पहिल्यांदा समर्थ रामदास स्वामींच्या रूपात स्वत:ला पाहिल्यानंतर काय भावना होत्या, त्या व्यक्त करताना विक्रम गायकवाड म्हणाले की, “दिग्दर्शकांनी ज्यावेळी मला मी स्वामींच्या भूमिकेत कसा दिसेल, याचं स्केच दाखवलं, त्यावेळी माझी निम्मी भीती कमी झाली होती. कारण, आपण किमान त्यांच्यासारखं दिसू, असं त्या स्केचमधून सिद्ध होत होतं. त्यानंतर, माझा अभिनेता म्हणून संशोधनाचा आणि अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी अधिकाधिक वाचन सुरू केलं. कारण, मला असं वाटतं की, काल्पनिक आणि सत्य जीवनातील पात्र साकारणं याचे फायदेही असतात आणि तोटेदेखील असतात. खरं पात्र साकारताना आपल्याला अभिनेता म्हणून नेमकं काय करायचं असतं, याची माहिती असते. पण, त्याचा तोटा हा असतो की आपल्या मनाचं काहीही करू शकत नाही; कारण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावण्याच्या संभावना असतात. पण, काल्पनिक पात्र साकारताना कलाकाराकडे बर्‍यापैकी मुभा असते. पण, ‘रघुवीर’ या चित्रपटात एका मोठ्या आणि सत्य जीवनात घडून गेलेल्या महान व्यक्तीची भूमिका साकारायची होती, त्यामुळे जबाबदारी नक्कीच फार होती. कारण, त्यांचा जन्म ते मृत्यू असा संपूर्ण कालखंड यातून आम्ही मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ७२ वर्षांचं आयुष्य दाखवणं सोप्पं नव्हतं, पण नट म्हणून आणि स्वामींचा भक्त म्हणून मी त्यांचं चरित्र मांडण्याचा लहानसा प्रयत्न नक्कीच केला आहे.”
 
माणूस म्हणून त्रास झाला... 
रामदास स्वामींची भूमिका साकारतानाचे चित्रीकरण करतानाचा एक किस्सा सांगताना विक्रम म्हणाले की, “स्वामींची भूमिका करताना माणूस म्हणून जरा त्रास झाला. त्याचं कारण असं की, आम्ही वाड्याला आदिवासी भागात चित्रीकरण करत होतो. तो प्रसंग असा होता की, त्या भागात समर्थांना जेवायला बोलावलं होतं आणि सगळ्यांसोबत ते जेवण करत असतात. तर, ते शूट झाल्यावर तिथे बसलेल्या आदिवासी लोकांना आम्ही सांगितलं की आता जेवून घ्या, जे ताटात वाढलं आहे ते. तर, तिथे एक आदिवासी मुलगा बसला होता आणि त्याने जेवण जेवायला नकार दिला. कारण, त्याच्या ताटात वाढलेलं श्रीखंड हे खाण्याचा पदार्थ आहे, हेच त्याला माहीत नव्हतं. तो म्हणाला की ‘तुम्ही काहीतरी खाऊ घालत आहात.’ पण, त्याचं ते उत्तर ऐकून व्यक्ती म्हणून मनात आलं की त्या बिचार्‍या आदिवासी मुलाला श्रीखंड हा गोड खायचा पदार्थ आहे, हे माहीत नाही.” ‘रघुवीर’ या चित्रपटात अभिनेता निनाद कुलकर्णी याने बालसमर्थांची भूमिका साकारली असून आपला अनुभव व्यक्त करताना तो म्हणाला की, “समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या विचारांची प्रगल्भता अभिनेता म्हणून मांडताना दडपण होतं. पण, आनंददेखील वाटत होता; कारण माझ्यात माणूस म्हणून आमूलाग्र बदल होणार होता, याची मला खात्री होती आणि त्यांचे विचार, संस्कार मला साकारता आले, याचा अत्यानंद आहे.”
 
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा चित्रपट दि. 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला असून, याच निमित्ताने पुन्हा रामदासांचे विचार, संस्कार, हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचतील, ते आचरणात आणले जातील आणि त्यांच्यावर लिहून ठेवलेलं साहित्य, लिखाण हे वाचले जाईल, अशी अपेक्षा आणि आशा आहे,” असे मत दिग्दर्शक निलेश यांनी व्यक्त केले.
 
स्वामींचं जीवन दोन तासांत मांडणं म्हणजे...
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ ़हा चित्रपट तयार करावा, हे कसे सूचले, याबद्दल बोलताना दिग्दर्शक निलेश कुंजीर म्हणाले की, “समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित आजवर एकही चित्रपट आला नव्हता. त्यामुळे स्वामींचे विचार आजच्या 21व्या शतकात समाजापर्यंत पोहोचावे, नव्या पिढीला समर्थ रामदास स्वामी कोण होते, हे समजावे, यासाठी ‘रघुवीर’ या चित्रपटाचा घाट घातला. आता इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट करणं ही सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठी अभ्यास, संशोधन हे अत्यंत गरजेचं होतं आणि त्याचसाठी आम्ही सज्जनगडावर गेलो. तेथील लोकांनी आम्हाला मदत केली. साहित्य, पुस्तकं देऊ केली आणि त्यातून अभ्यास करत आम्ही चित्रपटाची कथा लिहिली. अभिराम भडकमकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिली. कारण, केवळ दोन तासांच्या चित्रपट वेळमर्यादेत स्वामींचं जीवन दाखवणं फार अवघड आहे. मग, आम्ही विचार करून त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, घटना आणि आजच्या जगाशीदेखील त्यांचे कोणते आचारविचार मिळतेजुळते आहेत, त्याची छाटणी केली आणि त्यानुसार कथा बांधत गेलो.”
 
...म्हणूनच विक्रम यांची निवड
‘रघुवीर’ या चित्रपटात समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका अभिनेते विक्रम गायकवाड यांनी साकारली आहे. त्यांची या व्यक्तिरेखेसाठी निवड कशी झाली, याबाबत बोलताना दिग्दर्शक निलेश कुंजीर म्हणाले की, “ज्यावेळी समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर चित्रपट करायचे ठरवले होते, तेव्हाच स्वामींच्या भूमिकेसाठी विक्रम यांची निवड मी केली होती. पण, मला निर्मात्यांनी विक्रमच का, असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी मी त्यांना रामदास स्वामींच्या रूपात विक्रम कसे दिसतील, याचं स्केच काढून दाखवलं आणि त्यांनाही ते पटलं आणि मग या भूमिकेसाठी विक्रम यांची वर्णी लागली.”
 
पहिल्यांदा रामदास स्वामींच्या रूपात पाहिलं तेव्हा...
पहिल्यांदा समर्थ रामदास स्वामींच्या रूपात स्वत:ला पाहिल्यानंतर काय भावना होत्या, त्या व्यक्त करताना विक्रम गायकवाड म्हणाले की, “दिग्दर्शकांनी ज्यावेळी मला मी स्वामींच्या भूमिकेत कसा दिसेल, याचं स्केच दाखवलं, त्यावेळी माझी निम्मी भीती कमी झाली होती. कारण, आपण किमान त्यांच्यासारखं दिसू, असं त्या स्केचमधून सिद्ध होत होतं. त्यानंतर, माझा अभिनेता म्हणून संशोधनाचा आणि अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. त्यांची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी अधिकाधिक वाचन सुरू केलं. कारण, मला असं वाटतं की, काल्पनिक आणि सत्य जीवनातील पात्र साकारणं याचे फायदेही असतात आणि तोटेदेखील असतात. खरं पात्र साकारताना आपल्याला अभिनेता म्हणून नेमकं काय करायचं असतं, याची माहिती असते. पण, त्याचा तोटा हा असतो की आपल्या मनाचं काहीही करू शकत नाही; कारण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावण्याच्या संभावना असतात. पण, काल्पनिक पात्र साकारताना कलाकाराकडे बर्‍यापैकी मुभा असते. पण, ‘रघुवीर’ या चित्रपटात एका मोठ्या आणि सत्य जीवनात घडून गेलेल्या महान व्यक्तीची भूमिका साकारायची होती, त्यामुळे जबाबदारी नक्कीच फार होती. कारण, त्यांचा जन्म ते मृत्यू असा संपूर्ण कालखंड यातून आम्ही मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ७२ वर्षांचं आयुष्य दाखवणं सोप्पं नव्हतं, पण नट म्हणून आणि स्वामींचा भक्त म्हणून मी त्यांचं चरित्र मांडण्याचा लहानसा प्रयत्न नक्कीच केला आहे.”
 
माणूस म्हणून त्रास झाला...
रामदास स्वामींची भूमिका साकारतानाचे चित्रीकरण करतानाचा एक किस्सा सांगताना विक्रम म्हणाले की, “स्वामींची भूमिका करताना माणूस म्हणून जरा त्रास झाला. त्याचं कारण असं की, आम्ही वाड्याला आदिवासी भागात चित्रीकरण करत होतो. तो प्रसंग असा होता की, त्या भागात समर्थांना जेवायला बोलावलं होतं आणि सगळ्यांसोबत ते जेवण करत असतात. तर, ते शूट झाल्यावर तिथे बसलेल्या आदिवासी लोकांना आम्ही सांगितलं की आता जेवून घ्या, जे ताटात वाढलं आहे ते. तर, तिथे एक आदिवासी मुलगा बसला होता आणि त्याने जेवण जेवायला नकार दिला. कारण, त्याच्या ताटात वाढलेलं श्रीखंड हे खाण्याचा पदार्थ आहे, हेच त्याला माहीत नव्हतं. तो म्हणाला की ‘तुम्ही काहीतरी खाऊ घालत आहात.’ पण, त्याचं ते उत्तर ऐकून व्यक्ती म्हणून मनात आलं की त्या बिचार्‍या आदिवासी मुलाला श्रीखंड हा गोड खायचा पदार्थ आहे, हे माहीत नाही.”
 
‘रघुवीर’ या चित्रपटात अभिनेता निनाद कुलकर्णी याने बालसमर्थांची भूमिका साकारली असून आपला अनुभव व्यक्त करताना तो म्हणाला की, “समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या विचारांची प्रगल्भता अभिनेता म्हणून मांडताना दडपण होतं. पण, आनंददेखील वाटत होता; कारण माझ्यात माणूस म्हणून आमूलाग्र बदल होणार होता, याची मला खात्री होती आणि त्यांचे विचार, संस्कार मला साकारता आले, याचा अत्यानंद आहे.”
 
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘रघुवीर’ हा चित्रपट दि. २३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला असून, याच निमित्ताने पुन्हा रामदासांचे विचार, संस्कार, हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचतील, ते आचरणात आणले जातील आणि त्यांच्यावर लिहून ठेवलेलं साहित्य, लिखाण हे वाचले जाईल, अशी अपेक्षा आणि आशा आहे,” असे मत दिग्दर्शक निलेश यांनी व्यक्त केले.
Powered By Sangraha 9.0