"उद्धव ठाकरेंच्या काळातही अत्याचाराची प्रकरणं होतीच त्याचं..."; राज ठाकरेंचा सवाल

24 Aug 2024 13:17:01

Thackeray 
 
नागपूर : उद्धव ठाकरेंच्या काळातही अत्याचाराची प्रकरणं होतीच, त्याचं काय झालं? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी शनिवारी नागपूमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
 
राज ठाकरे म्हणाले की, "आमच्या पक्षातील महिला सेनेने बदलापूरची घटना उघड केली. पण ती एक घटना उघड झाल्यानंतर फटाक्यांची माळ कशी लागते हे कळलं नाही, असे म्हणत त्यांनी यावेळी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोची महिला अत्याचारांची आकडेवारीच वाचून दाखवली.
हे वाचलंत का? -  जातीयवादाला केवळ शरद पवार जबाबदार : राज ठाकरे
 
ते पुढे म्हणाले की, "आपल्याकडे महिलांवरील अत्याचारासाठी कठोर कायदा होत नाही. निर्भया प्रकरणातील कशा प्रकारे बलात्कार झाला, काय घडलं, हे सगळं कळल्यानंतरही आरोपीला किती वर्षांनी फाशी झाली? एका केसला एवढा विलंब होत असेल तर काय करायचं?" असा सवाल त्यांनी केला.
 
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदवर बोलताना ते म्हणाले की, "ज्यांनी आज महाराष्ट्र बंद पुकारला होता त्यांच्याही काळात बलात्काराची प्रकरणं घडली आणि आजही आहेत. पण आता ज्या वर्तमानपत्रात रोज बलात्काराच्या बातम्या येत आहेत त्यामागे राजकारण आहे का? की, येणाऱ्या निवडणूका आहेत? निवडणूका आल्यामुळे सरकारला बदनाम करा, असं सुरु आहे. उद्धव ठाकरेंच्या काळातही ही प्रकरणं होतीच. त्याचं काय करणार? अर्थात ते आतच बंद असल्यामुळे त्यांनी बाहेर बंद टाकला नाही."
 
"ज्यावेळी पोलिस याबाबतीत पुढाकार घेतात त्यावेळी तुमचे दबाव येतात. पोलिसांनी एखादी गोष्ट केल्यानंतर त्यांच्यामागे सरकारने खंबीरपणे उभं राहायला हवं. पोलिसांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. सरकारने पुढाकार घेऊन त्यांना मोकळीक दिली तर ते सगळं साफ करून ठेवतील. एवढी महाराष्ट्र पोलिसांमध्ये ताकद आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
Powered By Sangraha 9.0