श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर ‘मन मोह्यो सावरो’ कार्यक्रमाचे आयोजन

24 Aug 2024 14:55:51

mann mohyo savro
 
मुंबई :श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर ‘मन मोह्यो सावरो - भारतातील पुष्टीमार्गी मंदिरातील हवेली संगीत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी २८ ऑगस्ट रोजी मालाड येथील अस्पी ऑडिटोरियम येथे रात्री 8.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. गायक विनय रामदासन आणि गायिका अनुजा झोकरकर हे या कार्यक्रमात ‘हवेली संगीत’ या गीत प्रकाराचे सादरीकरण करणार आहेत. उमेश वारभुवन, आदित्य आपटे, अभिषेक बोरकर, रोहित खवळे, नुसरत अपूर्व, संदीप कुलकर्णी, हर्षद कुलकर्णी इत्यादी कलाकार त्यांना सांगीतिक साथ देणार आहेत. ‘पंचम निषाद’ या संस्थेचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow वर उपलब्ध आहेत.
 
Powered By Sangraha 9.0