उत्तर प्रदेशात केरला स्टोरीची पुनरावृत्ती

24 Aug 2024 18:31:44
 
Conversion
 
लखनऊ : हिंदू महिला आणि मुलींना फुस लावून लव्ह जिहादला बळी पाडण्याचे काम कट्टरपंथी करत आहेत. अशीच घटना उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडली आहे. हिंदू मुलीच्या आईला कट्टरपंथी युवतीने धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव आणला गेला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणात कट्टरपंथी तरूणी आरोपीचे आरजू सलमानी असे नाव आहे. आरोपी आरजू सलमानी ही सरकारी नोकरी करणाऱ्या हिंदू मुलीला काश्मीर आणि केरळ येथे जाण्यासाठी दबाव टाकत होती. हा प्रकार काही दिवसांत उघडकीस आला.
 
याप्रकरणात संबंधित आरोपी आरजू सलमानी विरोधात नजीकच्या पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. आरजू पीडितेला नमाज पडण्यासाठी प्रवृत्त करून तिच्यावर दबाव आणत होती. हे प्रकरण मेरठमधील मवाना पोलीस हद्दीतील  आहे. याप्रकरणात हिंदू मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.
 
तक्रारीत म्हटले की, तिची मुलगी ही पदवीचे शिक्षण घेत असताना तिची आणि आरजू सलमानीची ओळख झाली होती. तेव्हापासून त्या दोघीही एकमेकींना ओळखतात. सध्या ती सरकारी नोकरी करत आहे. काही काळानंतर आरजू पीडित मुलीच्या घरी जाऊ लागली. तिचे पीडितेच्या घरी येणे-जाणे अधिक वाढले होते. तिचे येणे जाणे हे पीडितेच्या आईला आवडत नसे. तसेच पीडितेला सलमानीने आपल्या मावशीच्या मुलासोबत मैत्री करण्यास सांगितली होती.
 
आरजू दररोज पीडितेला तिच्या मावशीच्या मुलासोबत देवबंद, काश्मीर आणि केरळ सारख्या ठिकाणी जाण्याचा आग्रह करू लागली. याप्रकरणात पीडितेला सलमानीकडून अनेक मेसेज आले होते. त्यावेळी आईने मेसेजचे सर्व स्क्रीनशॉट काढून याप्रकरणी माहिती गोळा केली आणि तक्रार दाखल करतेवेळी तक्रारीत नोंद केली.
 
याप्रकरणात बेकायदेशीर धर्मांतरण कायद्यांतर्गत आरजू सलमानीवर कारवाई करण्यात आली आहे. पीडितेने आरजूचे ऐकले नाही. त्यामुळे पीडित मुलगी लव्ह जिहादची शिकार होण्यापासून वाचली. दरम्यान पोलीस याप्रकरणात अधिक तपास करत आहेत. 
 
 
Powered By Sangraha 9.0