राज्य नाट्य स्पर्धांचे बिगुल वाजले
02-Aug-2024
Total Views |
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने होणाऱ्या हौशी मराठी, हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहे. १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत. या सर्व नाट्य स्पर्धा १५ नोव्हेंबेर २०२४ पासून सुरू होणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण नवरे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडणार आहेत.
नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गटवर्षी राज्यानाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि अधिक माहिती महानाट्यस्पर्धेच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. विहित मुदतीनंतर कोणत्याही प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.