मुंबई : कपटी आणि घाणेरड्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. शुक्रवारी संजय राऊतांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला आता राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे म्हणाले की, "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब असताना उद्धव ठाकरेंनी स्वपक्षातील कितीतरी नेत्यांच्या गाड्या फोडायला लावल्या. त्यांची घरं जाळायला सांगितली आणि त्यांची घरं उध्वस्त केलीत. उद्धव ठाकरेंनी कपटी आणि घाणेरड्या राजकारणात पीएचडी केली आहे. त्यामुळे भाजपवर टीका करण्याआधी संजय राऊतांनी त्यांच्या मालकाचा इतिहास तपासावा. कितीतरी शिवसेनेच्या नेत्यांना मारून टाकायचं आणि त्रास देण्याचे असंख्य उदाहरणं आम्ही देऊ शकतो."
हे वाचलंत का? - पूजा खेडकर फरार? चर्चांणा उधाण!
"मुंबईमध्ये दाऊदची प्रतिकृती म्हणून उद्धव ठाकरे काम करत आहेत. ज्यांनी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले आणि मुंबईत ड्रग्जचा व्यापार केला ते सगळे ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यामुळे ठाकरेंच्या आशिर्वादाने मुंबईत जिहादी आणि अतिरेक्यांच्या कारवाया सुरु आहेत का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे," असेही ते म्हणाले.