मुंबई : लाडकी बहिण योजनेच्या यादीत सर्वात जास्त उद्धवसेनेचेच लाभार्थी आहेत, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. संजय राऊतांनी लाडकी बहिण योजना फसवणूक असल्याची टीका केली होती. या टीकेला राणेंनी प्रत्युत्तर दिले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
नितेश राणे म्हणाले की, "लाडकी बहिण योजना फसवणूक असेल तर संजय राऊतांनी उबाठाच्या प्रत्येक शिवसैनिकांना या योजनेचा फायदा घेऊ नका असं सांगावं. लाडकी बहिण योजनेच्या यादीत आज अर्धे लोक उबाठाच्या कार्यकर्त्यांचे कुटुंब आहेत. एकीकडे योजनेवर टीका करायची आणि दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते लाभ घेताना दिसतात. त्यामुळे लाडकी बहिण योजना बंद करण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडीने सुरु केला आहे. पण महायूती सरकार ही योजना प्रत्येक माता, भगिनींपर्यंत पोहोचवणार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.
हे वाचलंत का? - कपटी आणि घाणेरड्या राजकारणात ठाकरेंची पीएचडी!
हिंदुत्व आमचा प्राण!
ते पुढे म्हणाले की, "हिंदुत्व हा आमचा प्राण आहे. देशातील आणि राज्यातील हिंदूंना जर आम्ही वाचवलं नाही तर महाविकास आघाडीचे लोक हिंदुंना संपवण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी नियोजन आखलेलं आहे. भाजप राज्यातील हिंदुंबरोबर खंबीरपणे उभा राहणार आहे. हिंदुत्वाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे," असेही ते म्हणाले.