पुणे : पुणे न्यायालयाने मनोज जरांगेंचे अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे. एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यानंतर आज ते पुणे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, आता त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
तसेच पुणे न्यायालयाने मनोज जरागेंना समज दिल्याचेही सांगण्यात येत आहे. समाजमाध्यमांमध्ये बोलताना न्यायालयाचा अवमान होईल, असे वक्तव्य करु नये. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी समज कोर्टाने त्यांना दिली आहे. तसेच त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे.
हे वाचलंत का? - लाडकी बहिण योजनेच्या यादीत उद्धवसेनेचेच लाभार्थी सर्वात जास्त!
नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंनी २०१३ मध्ये जालना येथे एका नाटकाचे सहा प्रयोग आयोजित केले होते. पण त्यांनी निर्मात्याला याचे पूर्ण पैसे दिले नव्हते. त्यामुळे नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगेंसह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात कोथरूड पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धनंजय घोरपडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात मनोज जरांगेंना दोनदा समन्स बजावण्यात आले. परंतू, ते सुनावणीकरिता उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला होता.