मनसेचं ठरलं! पुण्यात 'इतक्या' विधानसभा मतदारसंघात लढणार

    02-Aug-2024
Total Views |
 
Raj Thackeray
 
पुणे : विधानसभा निवडणूकीला आता जवळपास दोन महिने शिल्लक असताना सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यात ८ विधानसभा मतदारसंघ लढवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनासाठी अमेरिकेत गेलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत परत येताच संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांची तयारी सुरू केली आहे. पुण्यात मनसे आठ विधानसभा मतदारसंघात लढण्याच्या तयारीत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  ...अन्यथा राजकारणातून संन्यास घ्या! अजितदादांचं सुप्रिया सुळेंना आव्हान
 
लोकसभा निवडणूकी राज ठाकरेंनी महायूतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभा निवडणूकीत त्यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. मनसे यावेळी राज्यभरात २५० जागा लढविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यातील कल जाणून घेऊन मनसेची ताकद कुठल्या मतदारसंघात जास्त आहे याची चाचपणी केली जाणार असल्याचीही माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता पुण्यात मनसे ८ जागा लढवणार आहे.