नागपूर : नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. शुक्रवारी नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशीस संवाद साधला.
उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "नागपूर जिल्हा नियोजन आराखडा आम्ही १२०० कोटींपेक्षा जास्त नेला आहे. तसेच यात एक मोठी वाढ केली आहे. याव्यतिरिक्त या जिल्ह्यात विविध कामांवर जवळपास ५ हजार कोटी रुपये सरकारच्यावतीने दिलेले आहेत. या आराखड्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगिण विकास व्हावा आणि आरोग्य, शिक्षण, पायभूत सुविधा, वीज या सर्व क्षेत्रांचा विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत."
हे वाचलंत का? - "विरोधक देवेंद्रजींचा बालही बाका करू शकत नाहीत, कारण..."; मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य
"संरक्षित वनांच्या आसपास जी गावं आहेत तिथे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहेत. त्यामुळे तिथे सौर कुंपण योजना राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पांदण रस्त्यांसाठीसुद्धा आपण राखीव निधी ठेवला आहे. तसेच कुठल्याही योजनांना निधी कमी पडणार अशी व्यवस्था आम्ही केली आहे. आम्ही वीजबिल माफीचा जीआर काढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढची पाच वर्षे कुठलंही बिल भरण्याची आवश्यकता नाही," असेही ते म्हणाले.