एनएमडीसी स्टील निर्गुंतवणुकीच्या तयारीत, आर्थिक निविदा लवकरच मागविणार!

17 Aug 2024 17:53:55
nmdc steel disinvestment
 

नवी दिल्ली :       'नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन'(एनएमडीसी) स्टीलबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. छत्तीसगडस्थित एनएमडीसी स्टीलमधील निर्गुंतवणूक योजनेअंतर्गत पुढील दोन महिन्यांत आर्थिक निविदा मागविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून लवकरच आर्थिक निविदा मागविण्यात येणार आहेत.




दरम्यान, एनएमडीसी स्टील ही नवीन निर्गुंतवणूक योजनेंतर्गत योग्य कंपनी असून याबाबत सरकारचा विश्वास आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे. कंपनी यंत्रणा नवीन असून भागधारकांसाठी अधिक मूल्य निर्माण करू शकते. येत्या दोन महिन्यांत यासाठी निविदा मागवण्याची शक्यता तपासत येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने ऑक्टोबर २०२२ मध्ये छत्तीसगडमधील नागरनार स्टील प्लांटला प्रवर्तक कंपनी एनएमडीसीपासून वेगळे केले होते. दि. ०१ डिसेंबर २०२२ रोजी सरकारने एनएमडीसी स्टीलच्या धोरणात्मक विक्रीसाठी स्वारस्य व्यक्त केले होते आणि अनेक कंपन्यांनी प्रस्तावित करारासाठी स्वारस्य दाखवले होते. त्यानंतर आता कंपनीतील निर्गुंतवणुकीतून ५०.७९ टक्के हिस्सा विकला जाईल.





Powered By Sangraha 9.0