देशभरातील ४२ शहरांमधील सुमारे २ हजार गृहनिर्माण प्रकल्प रखडले

    15-Aug-2024
Total Views |
bharat housing projects pending


मुंबई :         देशभरातील अनेक शहरांमधील गृहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत. ४२ शहरांमधील सुमारे २ हजार गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून यात एकूण ५.०८ लाख सदनिकांचा समावेश आहे. हे प्रकल्प मुख्यतः विकासकांच्या पैशांचा गैरवापर आणि काम पूर्ण करण्याची त्यांची क्षमता नसल्यामुळे रखडले आहेत, असे 'PropEquity' या डेटा ॲनालिटिक्स कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, 'PropEquity' डेटानुसार, ५.०८ लाख फ्लॅट्सचे एकूण १,९८१ निवासी प्रकल्प रखडले आहेत. त्यापैकी १,६३६ प्रकल्प म्हणजेच ४,३१,९४६ फ्लॅट्स हे देशातील १४ मोठ्या शहरांमध्ये असून उर्वरित ३४५ प्रकल्प म्हणजे ७६,२५६ फ्लॅट्स छोट्या शहरांमध्ये आहेत. याशिवाय, २०१८ मध्ये रखडलेल्या फ्लॅटची संख्या ४,६५,५५५ वरून ५,०८,२०२ वर पोहोचली आहे.

'PropEquity' चे संस्थापक आणि CEO समीर जासुजा म्हणाले की, अनेक बांधकाम प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत याचे कारण बांधकाम व्यावसायिकांकडे काम पूर्ण करण्याची क्षमता नाही. तसेच, पैशाचा योग्य वापर केला जात नाही आणि नवीन प्लॉट खरेदी करण्यासाठी किंवा जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांचा दुरुपयोग केला जातो. असे त्यांनी म्हटले आहे.