टॅक्म कमी करून शून्यावर आणायची इच्छा आहे पण.....; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं मोठं विधान

13 Aug 2024 18:15:51
union finance minister nirmala sitharaman


नवी दिल्ली :            केंद्रीय अर्थसंकल्पात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्समध्ये सरकारने वाढ केल्यानंतर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर आकारणी जवळजवळ शून्यावर जावी अशी आपली इच्छा आहे, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच, देशासमोर अनेक मोठी आव्हाने असून त्याचा सामना करणे आवश्यक आहे. तसेच, संशोधन आणि विकासाकरिता निधी उभारणे आवश्यक असल्याचेही अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय अर्थसंकल्पात नवीन कर प्रणालीत केंद्र सरकारने नवीन बदल केले आहेत. ते म्हणाले, अर्थमंत्री या नात्याने त्यांचे काम सरकारचा महसूल वाढवणे असून लोकांना त्रास देणे नाही. ऊर्जा संक्रमणाच्या संदर्भात बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, देशाला आपली आश्वासने पूर्ण करण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागतील. याचे कारण आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आश्वासित पैसे अद्याप मिळालेले नसल्याचे अर्थमंत्री सीतारामण यांनी स्पष्ट केले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, पॅरिस करारात दिलेली आश्वासने भारताने स्वतःच्या पैशाने पूर्ण केली आहेत. तसेच, देशातील सरकारी दूरसंचार कंपनी असलेली बीएसएनएल कंपनीला पुन्हा बळ देण्याकरिता सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, सरकारने बीएसएनएलला खूप मदत आणि पाठिंबा दिला आहे. ते लवकरच 5G लाँच करतील. देशात जी 5जी सेवा आली आहे ती पूर्णपणे देशातच विकसित झाली आहे, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे.


Powered By Sangraha 9.0