'अॅपल' उत्पादनांना वाढती मागणी; ९ अब्ज डॉलर निर्यात उद्दिष्टाकडे वाटचाल

13 Aug 2024 16:14:16
apple production export raised


मुंबई :          अॅपलच्या आयफोन उत्पादनाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आयफोनच्या उत्पादनापैकी ८५ टक्के उत्पादन निर्यात झाली असून पीएलआय योजनेचे लक्ष्य पूर्ण केले आहे. दरम्यान, ४० हजार १४५ कोटी रुपये उत्पादन मूल्याच्या ७९ टक्के निर्यात केली आहे. अॅपल कंपनीने पहिल्यांदाच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये पीएलआय योजना संपण्याआधीच ८१ टक्के निर्यातीसह सरकारने दिलेले लक्ष्य मोडीत काढले आहे.

तसेच, कंपनीने चार महिन्यांत ३४,०८९ कोटी रुपयांचे फोन निर्यात केले. सरकारच्या पीएलआय योजनेचे लक्ष्य ओलांडताना आर्थिक वर्ष २०२५ करिता ९ अब्ज डॉलरपर्यंत निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-जून या कालावधीत कंपनीने आयफोनच्या उत्पादनाचे मूल्य ७९ टक्के निर्यात केले.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये साध्य केलेल्या ७३ टक्के लक्ष्याच्या तुलनेत ही मोठी वाढ होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने एकूण उत्पादन मूल्याच्या ७० टक्के निर्यात केली होती. दरम्यान, ९ अब्ज डॉलर निर्यात उद्दिष्टांसह पहिल्या चार महिन्यांत आधीच ४५ टक्के लक्ष्य गाठले आहे. हेच प्रमाण मागील चार महिन्यांतील उत्पादन मूल्यही मागील वर्षाच्या तुलनेत १८ टक्क्यांनी वाढले आहे.




Powered By Sangraha 9.0