मुंबई (ओंकार मुळ्ये) : (Hindu Worldwide Protest) बांगलादेशात हिंदूंविरुद्ध सुरु असलेला नरसंहार पाहता येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून तत्काळ आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणी जगभरातून होत आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात नव्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारकडे हिंदूंच्या रक्षणाची मागणी सर्वत्र होत आहे. बांगलादेशी हिंदूंकरीता आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांविरोधात विश्वसमुदायाने संघटित होण्याचे आवाहन विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केले होते. केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून तीव्र निदर्शने करत असल्याचे दिसते आहे.
हे वाचलंत का? : कट्टरपंथी जमावाने वंचितांवर धारदार शस्र्ताने केला हल्ला
बांगलादेशातील सध्याची राजकीय अशांतता देशाच्या हितासाठी हानिकारक आहे. त्यामुळे तेथील सर्व नागरिकांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करणाऱ्या जलद ठरावाची आशा असल्याचे मत हिंदू स्वयंसेवक संघाने नुकतेच व्यक्त केले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि अन्य अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी भारताने सर्वतोपरी प्रयत्न करवेत असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आले आहे. त्यानंतर आता भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया, वॉशिंग्टन डीसी, फिनलंड, बांगलादेश अशा विविध ठिकाणी हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून तीव्र निदर्शने केल्याचे पाहायला मिळत आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वजण बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात संघटीत झाले आहेत.
संयुक्त राष्ट्रानेही बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या हल्ल्यावर निषेध व्यक्त केला आहे. आम्ही वांशिक आधारावर होणारे हल्ले आणि हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात आहोत. आम्ही निश्चितपणे बांगलादेशचे सरकार आणि लोकांना आवश्यक वाटेल त्या मार्गाने पाठिंबा देण्यास तयार आहोत. बांगलादेशमध्ये अलिकडच्या आठवड्यात सुरू असलेला हिंसाचार संपुष्टात येईल याची आम्हाला पुन्हा एकदा खात्री करायची आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते यांनी ही माहिती दिली.
१) बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांच्या निषेधार्थ युएसमधील बे एरियामधील हिंदूंची निदर्शने
२) बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनार्थ ह्यूस्टन (यूएसए) येथे हिंदू बांधवांची निदर्शने.
३) मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे बांगलादेशातील पीडित अल्पसंख्याकांच्या समर्थनार्थ हिंदूसमाज मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.
४) मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथील हिंदू बांगलादेशातील अत्याचारित अल्पसंख्याक हिंदूंकरता रस्त्यावर उतरून आवाज उठवत आहे.
५) क्वालालंपूर (मलेशिया) येथील हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंचा छळ करणाऱ्या कट्टरतावाद्यांचा एकजुटीने निषेध केला.
६) बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार व मंदिरांची तोडफोड याविरोधात नेपाळमधील बीरगंज येथे हिंदू समाजाने निदर्शने केली. यावेळी उपस्थितांकडून बांगलादेश सरकारकडे हिंदू समुदायाच्या सुरक्षेची हमी देण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
७) बांगलादेश हिंसाचार प्रकरणी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसबाहेर हिंदूंची निदर्शने.
८) बांगलादेशातील हिंदूंच्या छळावर जागतिक मीडियाचे लक्ष नसल्यामुळे हिंदू, ज्यू आणि ख्रिश्चनांनी लंडनमधील बीबीसी मुख्यालयाबाहेर निदर्शने केली.
९) बांगलादेशी हिंदूंच्या न्यायाकरीता टाइम्स स्क्वेअर येथे हिंदू समाजाचे आंदोलन
१०) बांगलादेशातील हिंदूंर झालेल्या अत्याचाराप्रकरणी यूके संसदेबाहेर तीव्र निदर्शने.
११) बांगलादेशी कट्टरतावाद्यांविरोधात कॅनडातील टोरंटोमध्ये हिंदू संघटित.
१२) फिनलंडमधील हिंदूंनी बांगलादेशातील पीडित अल्पसंख्याक हिंदूंना न्याय देण्याची मागणी केली.
१३) लक्ष्यित हल्ले आणि भीतीच्या लाटेनंतर मध्य ढाक्यामध्ये हिंदूंचा मोठा निषेध.
१४) बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ अंदमानमधील शहीद द्विप (नील बेट) येथे हिंदूंचा मोर्चा