‘लॅण्ड जिहाद’चा राक्षस शहर गिळतोय!

10 Aug 2024 22:49:21
Land Jihad


शहरात मागासवर्गीय समाजातील व्यक्तीच मोठ्या प्रमाणात ‘लॅण्ड जिहाद’चा बळी होताना दिसते. कधी दहशतीने, कधी बेकायदेशीररित्या तर कधी कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत ‘लॅण्ड जिहाद’च्या माध्यमातून मागासवर्गीय समाजाच्या बांधवांचे जमीन, घर अतिक्रमित करणे या घटना सर्रास घडताना दिसतात. या परिक्षेपात ‘लॅण्ड जिहाद’चे वास्तव काय आहे? याचा मागोवा घेणारा हा लेख...

मुंबईत आलो, कष्ट केले. काटकसर करून झोपडी विकत घेतली. २०१४ साली आमच्या झोपडपट्टीची सोसायटी झाली आणि ‘एसआरए’अंतर्गत आमच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन झाले. झोपड्यांच्या जागी आम्हाला बिल्डिंगमध्ये घर मिळणार, हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. सात वर्षांनंतर बिल्डिंग उभी राहिली. २०२१ साल होते. कोरोना काळ होता. सगळे भाडेकरू इकडे तिकडे पांगले होते. ‘एसआरए’च्या अधिकार्‍यांनी इमारतीच्या घराच्या चाव्या सोसायटीच्या सेक्रेटरीकडे दिल्या. पण, मला चावी मिळाली नाही. कळले की, माझे घर आधीच कुणाला तरी विकले गेले होते. मी एकटा नव्हतोच. अशाच प्रकारे घराला मुकलेले एकूण १५ जण होते. आम्ही सगळे हिंदू होतो आणि ज्यांनी विकले ते आणि त्यांनी ज्यांना विकत घेतले ते दोन्हीही मुस्लीम होते. त्यांच्यापुढे आम्हा गरीब हिंदूंचे काही चालले नाही,” असे मत गोरेगावच्या एका सोसायटीच्या सदस्याने मांडले. मात्र, हे काय याच सोसायटीमध्ये असे घडले आहे का? तर तसे नाही. मुंबईतील पुनर्विकासांंतर्गत ‘एसआरए’ने उभ्या केलेल्या बहुसंख्य इमारतींमध्ये असले अनेक अद्भुत किस्से घडले आहेत, घडत आहेत.

अ‍ॅड. संदीप जाधव म्हणतात की, “माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत, ज्यात सरळसरळ दिसते की कागदपत्रांची अंमलबजावणी होऊन ‘एसआरए’ प्रकल्पातील घर एकाच्या मालकीचे आहे हे सिद्ध होते. असे असतानाही दुसरी व्यक्ती हेच घर परस्पर तिसर्‍या व्यक्तीला विकते. मूळ घरमालकाला त्याच्या अपरोक्ष त्याच्या हक्काचे घर विकणार्‍यांविरोधात उभे राहायची कसलीच ताकद नाही. तो स्थानिक पोलीस स्थानकात जातो. मात्र, त्याला सांगण्यात येते, ”एसआरएचे प्रकरण आहे तिथे जा. हे आमचे काम नाही.” सरळसरळ फसवणुकीची तक्रार असताना त्या मूळ घरमालकाची तक्रार घेतली जात नाही. मग हा मूळ घरमालक ‘एसआरए’च्या अधिकार्‍यांकडे जातो, तर त्याला सांगितले जाते, ”आम्हाला काय इतकेच उद्योग आहेत. परत येऊ नको.” तर त्याच्या अवतीभवतीचे लोक त्याला सांगतात, “आपले हिंदू कधीच संघटित होत नाहीत. तुझे घर विकणार्‍याबद्दल काही बोलू नकोस. तो आणि त्याचे लोक झुंडीने येतील आणि कधी तुला मारून पसार होतील, कुणाला कळणार नाही. त्यांच्या नादाला कशाला लागतो.” या सगळ्या प्रकाराने घाबरून ती लाचार व्यक्ती तिथे रडतभेकत बसते, पण कुणालाही दया येत नाही. कुणीही त्याच्या मदतीला येत नाही.

मात्र, आपल्या विरोधात तक्रार करायला मूळ घरमालक गेला होता, हे त्या गुन्हेगाराला तत्काळ कळते. कसे ते त्या गुन्हेगाराला आणि संबंधित व्यवस्थेलाच माहिती. प्रशासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणेचे अधिकारी यांच्या या असल्या वागण्यामुळे आणि समाजाच्या सज्जनशक्तीकडून काहीच सहकार्य न मिळाल्यामुळे मग मूळ मुंबईकर असलेला तो माणूस हतबल होत मुंबईच्या बाहेर जातो. ‘लॅण्ड जिहाद’चा नवीन पॅटर्न आहे. हक्काचे घर लुटले गेलेल्या गरीब लोकांना त्यांचे घर मिळावे, यासाठी अ‍ॅड. संदीप जाधव काम करतात. त्यांच्याकडे सध्या अशा ‘लॅण्ड जिहाद’च्या अनेक तक्रारी पुराव्यासह आहेत. ते गोरेगावला राहतात. आजूबाजूला सगळी मुस्लीम वस्ती. संविधानाला मानतात, पूजा करतात आणि तळागाळातल्या समाजासाठी विशेष काम करतात, आस्था ठेवतात म्हणून संदीप यांनी २०२२ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जन्मदिवस साजरा करायचे ठरवले.

मात्र, स्थानिक टोळक्यांनी धमक्या दिल्या. “हमारे इलाके मे ये नही चलेगा. समझ के रखना” वगैरे वगैरे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, स्वतंत्र भारत आहे. संविधान आहे. मला जे वाटते, ते मी करणारच म्हणून संदीप यांनी नरेंद्र मोदींचा जन्मदिवस सांग्रसंगीत साजरा करायचेच ठरवले. संध्याकाळी त्यांनी सगळ्या समविचारी लोकांना जमवले. मात्र, नेमकी लाईट गेली. ती लाईट केवळ संदीप यांच्याच घरची गेली होती. योगायोग असेल म्हणून संदीप यांनी त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. दुसर्‍या दिवशी संदीप यांच्या घरी नळाला पाणीच आले नाही. तब्बल १२ दिवस पाणी आले नाही. सोसायटीच्या कौमवाल्या सेक्रेटरीने त्यांच्या नळाची पाणीजोडणी काढून टाकली होती. संदीप यांनी विचारणा केल्यावर उर्मट उत्तरे दिली गेली. संबंधित यंत्रणेकडे जाऊन नळजोडणी करायची पत्र-निवेदने दिली. मात्र, काहीही झाले नाही. या काळात संदीप यांना जवळजवळ नऊ हजार रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागले. हे कुठपर्यंत सहन करायचे म्हणून मग संदीप यांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली आणि झालेली घटना सांगितली. यावर मंत्री मंगल प्रभात लोढांनी संबंधित यंत्रणेला योग्य त्या शब्दांत विचारणा केली आणि त्यानंतर संदीपच्या घरात नळाला पुन्हा पाणी आले.

मात्र, त्यानंतर संदीपच्या घरमालकालाच सांगितले गेले की, याला इथून हटवा. तो घरमालकही मुसलमानच. त्याने संदीपला घरातून ताबडतोब निघायला सांगितले. या सगळ्या काळात संदीपच्या घरासमोर टोळक्याने जमून गलिच्छ शब्द वापरणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे हे सगळे सुरूच होते. मात्र, मंत्री मंगल प्रभात लोढांकडे तक्रार गेली म्हटल्यावर या टोळक्याने जरा दमाने घेतले. या सगळ्या काळात संदीपला मंत्री मंगल प्रभात लोढा, रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे, भाजप पदाधिकार्‍यांनी खूपच धीर दिला. ‘लॅण्ड जिहाद’विरोधात उभ्या राहिलेल्या आंबेडकरी विचाराच्या तरुणाची ही कथा आणि व्यथा. दलित मुस्लीम भाई-भाई म्हणणारे काही मागासवर्गीय नेते आहेत, तसेच काही मुस्लीम नेतेही आहेत. त्यांचे संदीपबाबत काय मत असेल? नुकतेच धारावीमध्ये अरविंद वैश्य हत्याकांड घडले. या २०-२२ वर्षांच्या युवकाचा गुन्हा हाच की, धारावीमध्ये सुरू असलेल्या ‘लॅण्ड जिहाद’विरोधात तो आवाज उठवत होता. जिहाद्यांनी दिवसाढवळ्या त्याची हत्या करून सज्जनशक्तीला धमकीच दिली की, ‘आम्ही काय वाट्टेेल ते करू.

आमच्याबद्दल ब्र जरी बोलाल तर तुमची खैर नाही.’ अरविंद वैश्य हत्याकांडाच्या पूर्वी साकीनाका येथे मार्च २०२४ लाही अशीच घटना घडली होती. इकबाल खान नावाच्या इसमाने सिद्धेश घोरपड़े, राजेश चेट्टियार, तंगराज चेट्टियार, लक्ष्मी चेट्टियार आणि विक्की यांच्यावर चाकूने हल्ला केला. चाकूने हल्ला झालेल्या या लोकांचे म्हणणे की, इकबाल खानने हिंदू मंदिराच्या बाजूला अतिक्रमण केले. त्याविरोधात आवाज उठवला, त्यामुळे इकबालने त्यांना चाकूने मारले. या घटनेचे पडसाद उपनगरांत उमटले. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तत्काळ ते अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. असो. सध्याचे सरकार आणि मुंबई उपनगरांचे पालकमंत्री लोढा आणि हिंदूंबद्दल खरेच तळमळ असलेले रा. स्व. संघाच्या विचारांनी प्रेरित असलेल्या व्यक्ती या ‘लॅण्ड जिहाद’विरोधात गंभीरतेने काम करत आहेत. मात्र, ‘लॅण्ड जिहाद’चा विळखा भयंकर आहे. तो तुटायला थोडा वेळ लागेलच. त्यामुळेच आज तरी असे दिसते की, मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळेची भिंत, महानगरपालिकेच्या इस्पितळाची भिंत, टाटा पॉवरलाईनखालची जागा, मोठमोठ्या नाल्यांवर भर टाकून बनवलेली जागा, इथे झोपड्या वसल्या. या झोपडीधारकांना प्रकल्पग्रस्त म्हणून ‘एसआरए’अंतर्गत दुसरीकडे घरेही मिळाली. मात्र, या झोपड्या काही तुटल्या नाहीत. त्या तशाच आहेत. उलट या झोपडपट्टीचा परिघ वाढला आणि ‘मिनी पाकिस्तान’ म्हणवून घेण्याची त्यांची हौसही वाढली.

काही समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, बारकाईने पाहिले तर या अतिक्रमित जागांमध्ये सुरुवातीला आणि शेवटी तसेच रस्त्याच्या कडेला मोजून सात ते आठ बिर्याणी, शोरमा खिमा खाद्यपदार्थ बनवणारी दुकाने असतात. पण, या अनधिकृत वस्त्यांतील या दुकानांमध्ये १६ ते २५ वर्षांपर्यंतचे तरूण कामाला असतात. ते मुस्लीमच असतात. ते कुठून आले, कधी आले, याबाबत कुठेही नोंद केलेली असते की नसते माहिती नाही. (अर्थात, कोणी अधिकृतरित्या निवास आणि चरितार्थ चालवत असेल तर त्याला विरोध नाही) याच दुकानात गॅस, शेगडी, विळी, सुरी आणि अशीच कापायची, तोडायची हत्यारे मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, या दुकानात ग्राहकही तुरळक येतात. याचाच अर्थ दुकानदाराला नफा नाही. तरीही ही दुकाने १५-१५ तास सुरू असतात. का कशासाठी? तर उद्या दंगलसदृश काही झाले तर या अनधिकृत दुकानात काम करण्यासाठी कुठून आले, कधी आले, याची काही नोंद नसणारे तरुण काय करतील? याची खात्री कोण देणार? तसेच दुकानातली तोडणे, कापणे यासाठी वापरणारी हत्यारे कुणाविरोधात वापरली जातील, याबद्दल काय मत आहे? पण, यावरही सगळे शांत. हम दो हमारे दो किंवा एक असणारे हिंदू. ‘लॅण्ड जिहाद’च्या विरोधात उभे राहायचे तर जीवावर उदार व्हावे लागते. त्यामुळे सहसा कोणीही समोर सुरू असलेल्या ‘लॅण्ड जिहाद’बाबत काहीही बोलत नाही. मुर्दाड मनाने सगळे सहन करतात.

असो. मुंबईमध्ये एक दृश्य समान दिसते. वस्तीच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या घराचा मालक नेमका मुस्लीमच असतो. मालवणी-मालाडसारख्या वस्तीत तर एका घरावर तीन माळे चढवून नऊ घरे बांधून नऊ कुटुंबे भाडोत्री म्हणून ठेवले गेल्याचे दिसते. नऊ कुटुंबातील सरासरी सहा माणसे पकडली तरी त्या एका घराच्या जीवावर ५४ ते ६० माणसे राहतात. ते तिथे राहतात म्हणून नमाज पढायला जागा आणि मशीदही हवीच. त्याचीही निर्मिती अशीच केली जाते. एका घरासाठी असलेले पाणी आणि वीज कनेक्शन नऊ घरांना वापरले जाते, ही बाब तर सर्वस्वी दुर्लक्षित. मग अचानक हे सगळे लोक वस्तीमध्ये त्यांच्या सणामध्ये एकत्र दिसले की झोपलेला हिंदू जरा डोळे उघडतो आणि म्हणतो, अरे हे लोक कुठून आले? भाडोत्री म्हणून त्यांची पोलीस स्थानकांत नोंदही केलेली असते की नाही देव जाणे. मालाड-मालवणीच नव्हे, तर मुंबई उपनगरांतील म्हाडाच्या चाळीमध्ये तर सर्वत्र हेच चित्र आहे. ‘लॅण्ड जिहाद’ला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहेत मूळचे घरमालक जे बहुतांश हिंदूच असतात. पोलीस आणि इतर प्रशासन आणि या सगळ्यांकडे कानाडोळा करणारी स्थानिक सज्जनशक्ती आणि राजकीय नेतेही. प्रशासन आणि ज्यांचे खरेच समाजावर प्रेम आहे, देशावर प्रेम आहे, असे लोक जरा तरी गंभीर होतील का? ‘लॅण्ड जिहाद’चा राक्षस शहर गिळत आहे.


Powered By Sangraha 9.0