मंदिराच्या भिंतींवर लघुशंका करणाऱ्याला हटकले म्हणून कट्टरपंथींची हिंदू युवकाला रॉडने जबर मारहाण

01 Aug 2024 14:03:34
 
Dilip Singh 
पीडित दिलीप सिंह (सौजन्य : Punjab Kesari)
 
लखनऊ : कट्टरपंथी युवकाने लखनऊ स्थित एका मंदिराच्या भितीवर लघुशंका केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर त्याला रोखणाऱ्या दिलीप सिंह या हिंदू युवकाला जबर मारहाण करत त्याला रक्तबंबाळ केली आहे. त्याच्या घरात घुसून रॉडने हल्ला करत मरणासन्न अवस्थेत सोडून दिले. या प्रकरणात पोलीस तक्रार झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.
 
याबद्दल आलेल्या सविस्तर माहितीनुसार, लखनऊच्या राजाजीपुरमच्या एफ ब्लॉक स्थित मंदिराच्या भिंतीवर मंगळवार, दि. ३० जुलै रोजी आरोपी नदीम लघुशंका करत होता. याबद्दलच स्थानिक दिलीप सिंह यांनी त्याला रोखले. यानंतर दिलीप सिंहवर नदीम भडकला, त्याला शिव्या देऊ लागला. दोघांमध्ये झालेला वाद काही काळानंतर शांत झाला. मात्र, त्यानंतर मोहम्मद सलीम, मोहम्मद नफीस आणि कलीम हे तिघेही दिलीपच्या घरी रॉड घेऊन पोहोचले.
 
त्या सर्वांनी दिलीपवर जीवघेणा हल्ला केला. लाठ्याकाठ्यांसह रॉडनेही मारहाण केली. हा सर्व प्रकार दिलीपच्या घरीच घडला. यात एक रॉड दिलीपच्या डोक्यात बसला. तो गंभीर जखमी झाला. दिलीप रक्तबंबाळ झालेला पाहून सर्वचजण फरार झाले. दिलीप सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिघांनाही अटक करण्यात आलेली आहे. याबद्दल अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली. दरम्यान यापूर्वीही संबंधित मंदिरात मूर्तीला भंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यापूर्वी बरेलीतील मूर्तींची विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.
 
Powered By Sangraha 9.0