मुंबई : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना मानहानीच्या खटल्याप्रकरणी २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने हा दंड ठोठावला आहे. तसेच ही दंडाची रक्कम दोन आठवड्यात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हे वाचलंत का? - राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम दोन आठवड्यात जमा करण्यासही सांगण्यात आले आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे.