मुंबई : महाविकास आघाडीतील एका बड्या नेत्याकडे सुशांत सिंग राजपूतच्या खुनाचं सीसीटीव्ही फुटेज आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. तसेच या फुटेजचा वापर ते ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी करतात, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
नितेश राणे म्हणाले की, "उबाठा गटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळाव्यात महिलेच्या हत्येचा आरोप असलेल्या मुलाचा बाप आपल्या कारट्याचा राग देवेंद्र फडणवीसांवर काढत होता. स्वत:च्या मुलांना संस्कार दिले असते, तर अशा धमक्या आणि टपोरी भाषा उद्धव ठाकरेंना वापरावी लागली नसती. उभ्या आयुष्यात मच्छर न मारता येणारे उद्धव ठाकरे दुसऱ्यांना धमकी देतात. देवेंद्र फडणवीसांच्या पुढे आमच्यासारख्या असंख्या भाजप कार्यकर्त्यांची भिंत आहे. आधी ती भिंत ओलांडा आणि मग फडणवीसांविषयी बोलण्याची हिम्मत करा," असा इशारा त्यांनी दिला.
हे वाचलंत का? - "एकतर ते राहतील किंवा..."; अमोल मिटकरी मनसेविरोधात आक्रमक, पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन
ते पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांचं नाव पुसण्यासाठी तुमच्यासारख्यांना १०० जन्म घ्यावे लागतील. उद्धव ठाकरेंना मुळात स्वत:चा शत्रू कोण, हेच अजून ओळखता आलेलं नाही. सुशांत सिंग राजपूतच्या खूनाचं सीसीटीव्ही फुटेज महाविकास आघाडीच्या एका मोठ्या नेत्याने ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वत:कडे ठेवलेलं आहे."
"त्यामुळे अनिल देशमुख आताच दिशा सालियनचा विषय का काढताहेत, हे जेव्हा ठाकरेंना समजेल तेव्हा त्यांना फडणवीसांचं महत्व कळेल. आज अमित शाह, मोदीजी आणि फडणवीसांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे. अन्यथा काँग्रेसवाल्यांनी कधीच त्यांना आत टाकलं असतं," असेही ते म्हणाले.