मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Jagdeep Dhankhar RSS) "देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सर्व अधिकार आहेत", असे प्रतिपादन उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी केले. बुधवारी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी हे विधान केले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि आरएसएस यांच्यातील संबंध जोडणाऱ्या समाजवादी पक्षाच्या रामजी लाल सुमन यांच्या टीकेला उत्तर म्हणून हा निर्णय देण्यात आला होता.