डॉ. अंजना कुलकर्णी अनंतात विलिन; मुकुंद कुलकर्णी यांना पत्नीशोक

    01-Aug-2024
Total Views |
Anjana Kulkarni
 
मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे कार्यालय सचिव मुकुंद नारायण कुलकर्णी यांच्या पत्नी डॉ. अंजना कुलकर्णी (वय 57 ) यांचे मंगळवार, दि. 30 जुलै रोजी उपचारादरम्यान निधन झाले. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात अंजना कुलकर्णी यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी पहाटे 3.30 वाजता उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. शिवाजी पार्क, दादर येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.