हायब्रीड कारकरिता नो रजिस्ट्रेशन टॅक्स; EVs विक्रीस चालना मिळणार!

09 Jul 2024 15:35:20
hybrid cars electric vehicles registration tax


लखनऊ :         उत्तर प्रदेश सरकारने हायब्रीड कारवरील नोंदणी कर रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हायब्रीड कार नोंदणी कर माफ केल्याने मारुती, टोयोटा आणि होंडा या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. नोंदणी कर रद्द केल्यानंतर मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायराइडर, इनोव्हा हायक्रॉस आणि होंडा सिटी हायब्रीड सारख्या मॉडेल्सवर ग्राहकांना ३.५ लाख रुपये वाचवणार आहेत.

दरम्यान, पाच वर्षांच्या इन-स्टेट फायद्यासह इलेक्ट्रॉनिक वाहनावर सूट देण्याबाबत गेल्या वर्षी जाहीर करण्यात आले होते. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये दरमहा सुमारे शंभरहून अधिक हायब्रिड कार विकल्या गेल्या आहेत. ऑटोमोबाईल उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी युपी सरकारने त्यांच्यावरील नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्याने हायब्रिड कारच्या ऑन-रोड किमतीत ४ लाख रुपयांची घट झाली आहे.

गेल्या आर्थिक वर्ष २०२४ मध्ये उत्तर प्रदेशात दरमहा सुमारे १०० अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या हायब्रिड कारची विक्री झाल्याचे समोर आले आहे. दि. ०१ जुलैपासून लागू होणाऱ्या नवीन निर्देशासह, हायब्रीड वाहने आता नोंदणी शुल्क सवलतीसाठी इलेक्ट्रिक वाहनांसह (EVs) समाविष्ट करण्यात आली आहेत. भारतातील सर्वात मोठ्या ईव्ही बाजारपेठांपैकी एक असलेल्या उत्तर प्रदेशात या वाहनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

हायब्रीड कारवरील नोंदणी कर रद्द केल्यानंतर वाहनांची मालकी मिळण्याबाबत सुलभता, तसेच, चार्जिंगवर चालणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहनांकरिता पायाभूत सुविधांची नसते त्यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत चांगले मायलेज आणि कमी खर्च यांसारख्या कारणांमुळे वाहनांच्या विक्रीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.





Powered By Sangraha 9.0