रोजगार वाढीचा दर ७ टक्के; सिटीग्रुपचा दावा सरकारने खोडला!

09 Jul 2024 20:01:33
employment rate city group report


नवी दिल्ली :       देशांतर्गत रोजगारनिर्मितीचा दर ७ टक्के इतका असून केंद्रीय कामगार मंत्रालयाने सिटीग्रुपच्या अलीकडील अहवालाचे खंडन केले आहे. देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाजदेखील सिटीग्रुपने व्यक्त केला आहे. या अंदाजास कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून खंडन करण्यात आले आहे. उलटपक्षी दरवर्षी २ कोटी रोजगारनिर्मिती होत मागील पाच वर्षांत रोजगारवाढीचा दर वृध्दींगत झाला आहे.




मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, 'पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे'(PLFS) आणि आरबीआयच्या KLEMS सारख्या अधिकृत स्त्रोतांकडून उपलब्ध असलेल्या डेटानुसार सर्वसमावेशक आणि सकारात्मक रोजगार निर्मिती सुरू आहे. परंतु, सिटीग्रुपने केलेल्या संशोधन अहवालात, भारत ७ टक्के विकास दर असतानाही रोजगाराच्या पुरेशा संधी निर्माण करण्यासाठी संघर्ष करेल, असे म्हटले आहे.
 
सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व अधिकृत डेटा स्रोतांचे विश्लेषण न करणाऱ्या अशा अहवालांचे कामगार आणि रोजगार मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत, असे त्यात म्हटले आहे. दरम्यान, २०१७-१८ ते २०२१-२२ या पाच वर्षांच्या कालावधीत एकूण २० दशलक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मागील पाच वर्षांच्या काळात २०२०-२१ या कालावधी दरम्यान, कोरोना काळात रोजगारनिर्मिती मंदावली होती. त्यानंतर आता विविध क्षेत्रातील रोजगार वाढवण्याच्या उद्देशाने विविध सरकारी उपक्रमांची निर्मिती करण्यात येते आहे, असे मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0