गेल्या आर्थिक वर्षात स्टीलच्या वापरात १३ टक्के वाढ; क्रिसिल अहवाल!

09 Jul 2024 18:29:09
bharat steel use and production
 
 
नवी दिल्ली :        आर्थिक वर्ष २०२४ मध्ये देशात स्टील उत्पादनात मोठी वाढ दिसून आली आहे. क्रिसिलच्या अहवालानुसार, मागील वर्षी स्टील वापरात १३.६ टक्के इतकी वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे स्टील वापर १३.६ टक्के वाढ होत स्टील वापर १३६ दशलक्ष टनांवर पोहोचला आहे.

दरम्यान, देशांतर्गत पोलाद उत्पादनास मोठी मदत मिळत असून आर्थिक वर्ष १२.७ टक्के वाढीसह स्टील वापर १३९ दशलक्ष टनापर्यंत पोहोचले आहे, असे अहवालात म्हटले आहे. त्याचबरोबर, इन्फ्रा, मॅन्युफॅक्च्युरिंगवर लक्ष केंद्रित करतानाच पोलाद कंपन्यांना आशा आहे की सरकार पायाभूत विस्तारावर लक्ष केंद्रित करेल.


हे वाचलंत का? -     मिड-कॅप, स्मॉल कॅप श्रेणीतील शेअर्समध्ये प्रचंड वाढ!

 
पोलाद उद्योग क्षेत्राला जागतिक आयात स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याकरिता उत्तम प्लॅटफॉर्म मिळेल, असा विश्वास पोलाद उत्पादक कंपन्यांनी व्यक्त करताना दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात सुरू असलेला प्रचंड भांडवली खर्च नियंत्रणात ठेवून पायाभूत सुविधांच्या विकास, उत्पादन आणि व्यापारावर लक्ष केंद्रित करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासासाठी स्टीलचा वापर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. याच पार्श्वभूमीवर स्टील वापरकर्ता राष्ट्रीय बाजारपेठांसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठांनी कमी कामगिरी केली असतानाही केंद्र सरकारच्या फोकसमुळे स्टीलचा वापर वाढला आहे. त्यामुळे आगामी काळात पायाभूत सुविधांचा झपाट्याने होणारा विकास पाहता स्टील वापरात मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




Powered By Sangraha 9.0