गाढवांसोबत पाकिस्तानने सुरू केली भिकाऱ्यांची निर्यात

09 Jul 2024 17:36:13
 pakistan beggers
 
इस्लामाबाद : भीक मागण्यासाठी परदेशात जाणाऱ्या भिकाऱ्यांमुळे हैराण झालेल्या पाकिस्तान सरकारने २ हजारांहून अधिक भिकाऱ्यांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भिकारी पासपोर्ट घेऊन परदेशात जाऊन भीक मागतात, यामुळे पाकिस्तानच्या प्रतिष्ठेला तर हानी पोहोचतेच, पण त्या देशातील नागरिकांचा आदरही कमी होतो, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
 
अहवालानुसार, पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की हे भिकारी परदेशात जाऊन देशाची प्रतिमा खराब करतात, त्यामुळे जगभरातील पाकिस्तानी दूतावासांना परदेशात जाऊन असे कृत्य करणाऱ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. सूत्रांच्या हवाल्याने असेही सांगण्यात आले आहे की, देश सोडल्यानंतर जर कोणी पाकिस्तानात भीक मागताना पकडले गेले तर त्याचा पासपोर्ट ७ वर्षांसाठी निलंबित केला जाईल. याशिवाय या भिकाऱ्यांना मदत करणाऱ्या एजंटचा पासपोर्टही रद्द करण्याचा विचार सरकार करत आहे.
 
अलीकडेच अशी प्रकरणे समोर आली आहेत जेव्हा पाकिस्तानचे अनेक भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराक सारख्या देशांमध्ये तीर्थयात्रा किंवा उमराहसाठी गेले होते परंतु तेथे भीक मागण्याची सवय सोडू शकले नाहीत. या समस्येला तोंड देण्यासाठी पाकिस्तान सरकार नवीन नियम बनवण्याचा विचार करत आहे.
 
गेल्या वर्षीही ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानातील २४ जण यात्रेकरू म्हणून सौदी अरेबियाला जाणाऱ्या विमानात बसले होते. मात्र, ते भिकारी असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मुलतान विमानतळावर भीक मागण्याच्या संशयावरून १६ जणांना विमानातून उतरवण्यात आले होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0