पाकिस्तानने तब्बल २ हजार पासपोर्ट केले निलंबित; कारण वाचून व्हाल थक्क!

08 Jul 2024 17:35:27
pakistan-has-suspended-the-passports


नवी दिल्ली :       पाकिस्तानने हजारांहून अधिक व्यावसायिकांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारने परदेशात जाऊन देशाची प्रतिमा मलीन करणाऱ्या २ हजाराहून अधिक व्यावसायिकांचे पासपोर्ट निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.


हे वाचलंत का? -     देशातील तात्पुरत्या स्वरुपाच्या रोजगारनिर्मितीत ६ टक्के वाढ, आरबीआयचा अहवाल


अहवालात म्हटले आहे की, व्यक्तींची यादी जागतिक स्तरावर पाकिस्तानी दूतावासांकडून गोळा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला तपशीलांसाठी विनंती करण्यात आली असून सरकारने म्हटले आहे की, परदेशात गैरआर्थिक वर्तन करणे केवळ पाकिस्तानच्या प्रतिष्ठेलाच हानी पोहोचवत नाही तर तेथील नागरिकांचा सन्मान देखील कमी करते, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, पाकिस्तानबाहेर आर्थिक गैरव्यवहार करताना पकडलेल्या व्यक्तींचे पासपोर्ट ७ वर्षांसाठी निलंबित करावे लागत आहे. परदेशात आर्थिक गैरव्यवहार केवळ पाकिस्तानच्या प्रतिष्ठेलाच हानी पोहोचवत नाही तर तेथील नागरिकांचा सन्मानही कमी करते, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0