मुंबईतील कोणत्या भागात किती पाऊस! वाचा सविस्तर

08 Jul 2024 12:48:29
Mumbai rains Updates


मुंबई :
मुंबई महापालिकेकडून दि. ७ जुलै ते ८ जुलैपर्यंत २४ तासात पडलेल्या पावसाळी परिस्थितीच्या अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालानुसार, मुंबई शहरात ११५.६३ मिलिमीटर , पूर्व उपनगरात १६८.६८ मिलिमीटर, पश्चिम उपनगरात १६५.९३ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,कुलाब्यात ८३.८ मिलिमीटर आणि सांताक्रुझमध्ये २६७.९ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे. तसेच कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासात वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडेल.

याबरोबर दि. ८ जुलै रोजी मध्यरात्री १ ते ८ या ७ तासात मुंबई शहरात सायनमध्ये २२१ मिमी, शिवडी कोळीवाड्यात १८६ मिमी,रावळी कॅम्प येथे १७८ मिमी, धारावी काळा किल्ल्यात १६८ मिमी,वडाळ्यात १५७ मिमी पाऊसाचे प्रमाण नोंदवण्यात आले आहे. तसेच पूर्व उपनगरात पासपोली-३२० मिमी,पवई-३१९ मिमी,कलेक्टर कॉलनी,चेंबूर-२२२मिमी, मुलूंड-२१९,विक्रोळी-२०० मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्यासोबत पश्चिम उपनगरात अंधेरी-२९८ मिमी,चकाला-२८३ मिमी,गोरेगाव-२७९ मिमी, वेरावली-२६७ मिमी,वाकोला-२४० मिमी अशा पाऊसाचे प्रमाण नोंदवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई शहरात हिंदमाता,गांधी मार्केट आणि पुर्व उपनगरात अस्लफा लास्टा बस स्टॉप,साबळे नगर, नेहरू नगर,शितल तलाव,कुर्ला रेल्वे स्टेशन, सुधा जंक्शन कुर्ला,गौरी शंकर नगर,एम जी रोड जंक्शन, घाटकोपर,त्रिमुर्ती सोसायटी- चुनाभट्टी,वेलकम हॉटेल- घाटकोपर या भागात तसेच पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे,खास सबवे,मिलन सबवे,एअर इंडिया कॉलनी,आकृती मॉल-अंधेरी, गुलमोहर इर्ला जंक्शन,नेताजी पालकर रोड,मालवणी बस डेपो इत्यादी भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे पाणी साचलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा संथ गतीने होतो.
 
Powered By Sangraha 9.0