मुसळधार पावसामुळे हार्बर लाईन ठप्प; नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

08 Jul 2024 11:12:57
 navi
 
मुंबई : मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व लोकल लाईनवरील वाहतूक खोळंबली आहे. मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सेंट्रल लाईन आणि नवी मुंबईला मुंबईसोबत जोडणाऱ्या हार्बर लाईनला बसला. सेंट्रल लाईन आणि हार्बर लाईनला जोडणाऱ्या कुर्ला स्थानकात पाणी साचल्यामुळे पनवेल वरून येणाऱ्या ट्रेन फक्त मानखुर्द पर्यंतच धावत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर गर्दी प्रवाशांची गर्दी झाली आहे.
दि. ७ आणि ८ जुलैच्या एका रात्रीत मुंबई ३०० मिमी इतका पाऊस पडला आहे. त्यासोबतचं भारतीय हवामान विभागाने दि. ८ जुलै रोजी दिवसभर मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसाचा जोर अद्याप चालूच असल्यामुळे साचलेले पाणी ओसरण्यास उशीर होत आहे.
काही भागातील पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्यानंतर सेंट्रल लाईनवरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पण, हार्बर लाईनवरील टिळक नगर, कुर्ला, चुनाभट्टी स्थानकांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुंबईत सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0