मैतेई समाजासाठी मानाची रथयात्रा; अज्ञातांकडून रथावर गोळीबार!

06 Jul 2024 15:59:54
maitei community rathyatra fire


नवी दिल्ली :
       मणिपूरची राजधानी इंफाळ येथे रथयात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या रथावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री १२:३० वाजता सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी बांधकाम सुरू असलेल्या रथावर गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, इंफाळमधील साना कोनुंजवळ घडलेली घटना जिथे रथ उभारण्यात येत होता. नजीकच्या प्रगत रुग्णालयाच्या दिशेने हल्लेखोर कारमधून आले होते. त्यानंतर कारमधून बाहेर पडत रथावर दोन राऊंड फायर केले. गोळीबार केल्यानंतर राजवाड्याच्या गेटच्या दिशेने पळत सुटले. सुदैवाने, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


हे वाचलंत का? -    स्वदेशी ‘एके-203’ रायफल्सची पहिली खेप भारतीय सैन्याकडे सुपुर्द


विशेष म्हणजे मणिपूरमध्ये भगवान जगन्नाथाच्या यात्रेसाठी रथ तयार केला जात होता, अज्ञात इसमांनी या रथावर गोळीबार केला असून पोलीसांकडून तपासात करण्यात येत आहे. या रथाविषयी बोलायचे झाल्यास मेईतेई समाजाचे लोक ही रथयात्रा काढतात. मणिपूर सरकारच्या माहितीनुसार, इंफाळमधील ही रथयात्रा राज्याच्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. हा उत्सव १० दिवस चालतो तर रथयात्रा ही ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेसारखीच आहे.

इंफाळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ते प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. दि. ०८ जुलै २०२४ रोजी ही रथयात्रा निघणार असून त्यासाठीच हा विशेष रथ तयार करण्यात येत होता. या रथावर हल्ला का करण्यात आला याचे कारण स्पष्ट झालेले नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.


Powered By Sangraha 9.0