माजी मंत्र्यांच्या स्वीय सचिवापासून नोकरापर्यंत सर्वांच्या मालमत्ता जप्त!

06 Jul 2024 16:32:47
jharkhand former minister ed raid


नवी दिल्ली :           झारखंडचे माजी मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल, त्यांच्या पत्नी रितात लाल व नोकर जहांगीर आलम यांची ४ कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या तात्पुरत्या जप्त केलेल्या मालमत्तेचे प्रकरण आता न्याय प्राधिकरणाकडे गेले आहे. तब्बल ४ कोटी ४२ लाख ५५ हजार रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून संपूर्ण घोटाळा ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, निविदेतील कमिशन घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या ईडीने मोठी कारवाई करत पुढील १८० दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे. झारखंडचे माजी मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिव ते नोकरपर्यंत मालमत्तांवर ईडीकडून टाच आणली आहे. यात मंत्र्यांचा हिस्सा १.३५ टक्के तर ईडीच्या कारवाईत स्वीय सचिवाच्या घरी नोटांचा खच सापडला आहे.


हे वाचलंत का? -    मैतेई समाजासाठी मानाची रथयात्रा; अज्ञातांकडून रथावर गोळीबार!


विशेष म्हणजे एकूण निविदा रकमेपैकी ३ ते ४ टक्के रक्कम जमा झाल्याचे संजीवकुमार लाल यांनी चौकशीदरम्यान कबूल केले होते. यात माजी मंत्री १.३५ टक्के रक्कम घेत असत. सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याकडून मुख्य अभियंता यांच्यामार्फत ही रक्कम वसूल करण्यात आल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, ईडीला तपासात या सर्व मालमत्ता बेकायदेशीर पैशातून मिळविल्याचे आढळले आहे.

माजी मंत्री आलम यांचा स्वीय सचिव संजीव लाल याने आपल्या पदाचा गैरवापर करून ही मालमत्ता स्वत:च्या, पत्नीच्या आणि नोकराच्या नावे खरेदी केल्याचे तपासात समोर आले आहे. एकूण निविदा रकमेपैकी तीन ते चार टक्के रक्कम जमा झाल्याचे संजीव कुमार लाल यांनी चौकशीदरम्यान कबूल केले होते, असे ईडीने जप्त केलेल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याकडून मुख्य अभियंता यांच्यामार्फत ही रक्कम वसूल करण्यात आली. ही रक्कम रोख स्वरूपात जप्त करण्यात आली.




Powered By Sangraha 9.0