हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक!

06 Jul 2024 18:52:00
hathras case uttar pradesh


नवी दिल्ली :     
     हाथरस घटनेतील कार्यक्रमाचा मुख्य आयोजक आणि मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकर आणि अन्य दोन आरोपी राम प्रकाश शाक्य आणि संजू यादव यांना अटक करण्यात आली आहे. हाथरस प्रकरणातील प्रमुख आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती हाथरसचे पोलिस अधिक्षक निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.

पत्रकारपरिषदेत ते म्हणाले, मुख्य आरोपी आणि कार्यक्रमाच आयोजक देव प्रकाश मधुकर आणि इतर २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी ६ आरोपींना अटक करण्यात आली होती. काही काळापूर्वी त्याच्याशी काही राजकीय पक्षांनी संपर्क केल्याचेही चौकशीदरम्यान उघड झाले आहे., त्यांच्या साधनसंपत्तीचा निधी कोणत्याही राजकीय पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी दिला जात आहे का, याची सखोल चौकशी केली जात आहे.




भारतीय न्याय संहितेच्या कलम 105/110/126(2)/223/238 अन्वये मुख्य आयोजक देव प्रकाश मधुकर आणि इतर लोकांविरुद्ध सिकंदर राव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देव प्रकाश मधुकर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे सेवेदार आणि समिती सदस्यांनी सत्संग पंडालभोवती बॅरिकेडिंग, प्रवेशद्वार, एक्झिट गेट, आसनव्यवस्था, पार्किंग आणि इतर सुविधांची संपूर्ण जबाबदारी असल्याचे पोलिस अधिक्षकांनी सांगितले.

आरोपी देव प्रकाश व इतरांनी पोलीस प्रशासनाला कार्यक्रमाच्या आत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यापासून रोखले होते. तेथे त्यांचे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पोशाखात कमांडोच्या रूपात सर्व व्यवस्था पाहत होते. तेथे कोणत्याही व्यक्तीला व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करण्यापासून रोखण्यात आले होते. व्यवस्था नीट न झाल्याने प्रशासनाच्या परवानगी पत्रातील अनेक अटींचे उल्लंघन होऊन वाहतूक व्यवस्था आदींवर परिणाम झाला, असेही त्यांनी सांगितले आहे.


राजकीय पक्षाचाही संबंध

आरोपी देवप्रकाश मधुकर याच्या चौकशीत काही राजकीय पक्षांनी त्याच्याशी काही काळापूर्वी संपर्क केल्याचेही समोर आले आहे. निधी संकलनाबाबत, अशा कार्यक्रमांना आणि अन्य साधनांना कोणत्याही राजकीय पक्षाकडून निधी दिला जातो का, याची कसून चौकशी केली जात आहे. आतापर्यंतच्या चौकशीतून त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक फायद्यासाठी एका राजकीय पक्षाचा त्यांच्याशी संबंध असल्याचे दिसून येते. आरोपी देव प्रकाश मधुकरशी संबंधित सर्व बँक खाती, स्थावर आणि जंगम मालमत्ता आदींचा तपास सुरू आहे, अशीही माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.



Powered By Sangraha 9.0