'द नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ ट्री'च्या माध्यमातून 'वनमहोत्सव'चे आयोजन!

06 Jul 2024 16:22:54
Trees news

मुंबई :
'द नॅशनल सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ ट्री'च्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे दि. ७ जुलै रोजी 'वनमहोत्सव' आयोजित करण्यात आला आहे. या वनमहोत्सवात सकाळी १० ते १२ या वेळेत गोकुळ सुषमा, लिंकिंग रोड एक्स्टेंशन, सांताक्रुझ(पश्चिम) येथे रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. तीन वर्षाहून अधिक कालावधीत वाढ झालेली ही रोपे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर मोफत वाटप करण्यात येणार आहेत. त्यात चिकू, आंबा, नारळ, जांभूळ अशा फळझाडांचा आणि सीता अशोक, ताम्हण यासारख्या बागेत किंवा रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या रोपांचा समावेश आहे.
 
तसेच वृक्षप्रेमींना वृक्षारोपणासाठी आणि वृक्षारोपणानंतर काय काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. गोदरेज ट्री बँकेने या उपक्रमाला अनेक वर्ष पाठिंबा दिलेला आहे. तसेच पद्मजाबेन आणि सुनील सरैया यांनी देखील वितरणासाठी आणखी झाडे उपल्बध करून दिली आहेत. तरी जास्तीजास्त वृक्षप्रेमींनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण सावंत यांनी केले आहे. तरी अधिक माहितीसाठी ९९२०२५२३७५ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता.




Powered By Sangraha 9.0