दूरदर्शन प्रसारित करणार श्रीरामांवर आधारित ॲनिमेशन मालिका

06 Jul 2024 15:20:09

Sriman Rama

मुंबई (विषेश प्रतिनिधी) :
हैदराबादस्थित मारा क्रिएशन्सने 'श्रीमान रामा' (Sriman Rama Doordarshan) नावाची ॲनिमेटेड टेलिव्हिजन मालिका विकसित केली आहे. रविवार, ७ जुलै २०२४ पासून दूरदर्शनवर मालिकेचा प्रीमियर होणार आहे. दर रविवारी दुपारी १२ ते १२:३० या वेळेत ही मालिका प्रसारित केली जाईल. एकूण ५२ भागांत मालिका चालेल. संपूर्ण मालिकेची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते सत्यकाशी भार्गव यांनी केले आहे.

हे वाचलंत का? : कलेचे रसग्रहण करण्याच्या दृष्टीने रसिकांनीही रियाज करायला हवा : अंबरीश मिश्र

ॲनिमेशन मालिकेचा उद्देश केवळ मनोरंजनच नाही तर दर्शकांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाबद्दल शिक्षित करणे देखील आहे. या मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितले की, 'श्रीमान रामा' ही मुले आणि कुटुंब दोघांनाही गुंतवून ठेवण्यासाठी ॲनिमेशन स्वरूपात तयार केलेली मालिका आहे. ही मालिका समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि जीवनमूल्ये त्यांना समजेल अशा स्वरूपात आहे.

निर्मात्यांचा दृष्टीकोन हे सुनिश्चित करतो की प्रत्येक भागामध्ये श्रीरामाचे सद्गुण अंतर्निहितपणे चित्रित केले जातील व ते शिक्षण आणि मनोरंजन दोन्ही प्रदान करतील. येत्या काळात ही मालिका भारतीय टेलिव्हिजनमधील एक महत्त्वाची मालिका निश्चितच बनेल. ही मालिका रामायणापासून प्रेरित असली तरी, ती महाकाव्याची पुनरावृत्ती करत नाही. तर ऋषी वसिष्ठ यांच्या गुरुकुलात शिक्षणादरम्यान रामललाच्या काल्पनिक साहसांभोवती केंद्रित आहे. श्रीरामाच्या मूल्यांना आणि गुणांवर प्रकाश टाकणाऱ्या नवीन कथा या मालिकेतून सादर केल्या जातील. श्रीरामाचे सद्गुण, धैर्य आणि धर्माचे पालन प्रत्येक भागामध्ये चित्रित केले गेले आहे.



Powered By Sangraha 9.0