राहुल गांधींविरोधात हिंदु जनजागृती समिती आक्रमक

06 Jul 2024 16:47:17

Hindu Janajagruti Samiti

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अशी मागणी हिंदु जनजागृती समिती, नागपूर (Hindu Janajagruti Samiti Nagpur) तर्फे करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना हिंदु जनजागृती समितीने याबाबत नुकतेच एक निवेदन पत्र दिले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान हिंदूंना हिंसक संबोधत गंभीर वक्तव्य केले होते. त्यावर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

हे वाचलंत का? : दूरदर्शन प्रसारित करणार श्रीरामांवर आधारित ॲनिमेशन मालिका
निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी काँग्रेसने भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला होता. काँग्रेस नेहमीच जागतिक पातळीवर हिंदू समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आली आहे. राहुल गांधींचे मंदिरांना भेट देणे आणि हातावर पवित्र धागा बांधणे ही शुद्ध फसवणुक होती, हे सिद्ध झाले आहे.

पुढे त्यात असेही म्हटले आहे की, त्यांचे विधान अत्यंत अनुचित व समाजात फूट पाडणारे आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे देशातील एकतेला धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. समाजात भेद निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक लढवण्यासाठी कायमस्वरूपी बंदी घातली पाहिजे.

Powered By Sangraha 9.0