विज्ञान शाखेत उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू

05 Jul 2024 17:43:17

science  
 
मुंबई : मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षणाकरिता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनापर साहाय्य मिळावे, याकरिता मराठी विज्ञान परिषदेने शिष्यवृत्ती योजना २०१६पासून नवीन स्वरूपात सुरु केली. या शिष्यवृत्तीकरिता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातील आठ म्हणजे एकूण ३२ विद्यार्थ्यांची निवड यावर्षी केली जाईल.
 
२०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात एम.एससी./एम.ए.(गणित) ह्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात. अधिक माहितीकरिता संपर्क: ९९६९१ ००९६१ (११ ते ५)या  संकेतस्थळ:  
भेट द्या  
 
Powered By Sangraha 9.0