झोपु’ योजनेतील घरे विकण्यासाठी आता ऑनलाईन एनओसी

05 Jul 2024 13:24:22

slume
 
मुंबई : “झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तील घरे विकण्यासाठी ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ ऑनलाईन पद्धतीने दिले जाणार असून अर्ज केल्यानंतर 45 दिवसांत प्रमाणपत्र मिळणार,” अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी गुरुवार, दि. 4 जुलै रोजी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तील घरे विकण्यासाठी लागणार्‍या ‘ना-हरकत प्रमाणपत्रा’बाबत सदस्य प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.
 
त्याला मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. यावेळी सदस्य भाई गीरकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तर प्रवीण दरेकर, कपिल पाटील, जयंत पाटील यांनी प्रश्न मांडले. मंत्री सावे म्हणाले की, “झोपडपट्टी पुनर्वसन योजने’तील घरे विकण्यासाठीच्या अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच, ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ लवकरच ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. झोपडीधारक मृत असल्यास त्याच्या वारसदाराने वारसा प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांनाही ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ देण्यात येत येईल,” अशी माहिती सावे यांनी दिली.
 
Powered By Sangraha 9.0