ब्रिटनमध्ये १४ वर्षानंतर सत्ता परिवर्तन! सुनक यांच्या पक्षाचा दारूण पराभव; 'हा' नेता होणार नवा प्रधानमंत्री

05 Jul 2024 11:04:37
 UK Results
 
लंडन : ब्रिटनमध्ये दि. ४ जून २०२४ ला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतमोजणी अंतिम टप्प्यात आली असून आता ब्रिटनमधील राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. मजूर पक्ष प्रचंड बहुमताने ब्रिटनमध्ये सत्ता काबीज करणार असून मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होऊ शकतात.
 
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी विरोधी पक्षनेते असलेल्या केयर स्टारर यांचे त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले. आत्तापर्यंत मजूर पक्षाने ३०० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ ८१ जागा मिळाल्या. निवडणुकीच्या निकालावर आपल्या संसदीय मतदारसंघ रिचमंड आणि नॉर्दर्न एलर्टनमधील समर्थकांना संबोधित करताना ऋषी सुनक म्हणाले, 'मी माफी मागतो आणि या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो.'
  
पुढे बोलताना ऋषी सुनक म्हणाले की, 'मजूर पक्षाने ही निवडणूक जिंकली आहे आणि मी केयर स्टारर यांना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी फोन केला. आज शांततेत सत्ता हस्तांतरण होईल.' ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणारे मजूर पक्षाचे नेते केयर स्टारमर यांनी निवडणुकीच्या निकालांबद्दल मतदारांचे आभार व्यक्त केले आणि म्हटले की, 'देशातील लोक बदलासाठी तयार आहेत आणि त्यांनी दिखाव्याचे राजकारण संपवण्यासाठी मतदान केले आहे.'
 
 
Powered By Sangraha 9.0