९०० कोटींच्या गुंतवणूकीसह कर्जमुक्ती, 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ!

04 Jul 2024 17:20:22
investment share rised
 

नवी दिल्ली :         आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड शेअर्स मोठी वाढ दिसून आली आहे. या शेअरमधील ९०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनी कर्जमुक्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज सकाळच्या सत्रात कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, मार्केटमधील सुरूवातीच्या व्यवहारांत कंपनीच्या समभागांनी १० टक्क्यांहून अधिक उसळी घेतली. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे कंपनी प्रवर्तकांनी ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रवर्तकाने दि. २८ मे २०२४ रोजी ब्लॉक डीलद्वारे आयनॉक्स विंड लिमिटेडमधील आपला हिस्सा विकून ही रक्कम उभी केली होती.

या ब्लॉक डीलद्वारे आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे २.७५ कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यात आले. संपूर्ण डील सरासरी १५१ रुपये प्रति शेअर या दराने करण्यात आली आणि डीलची एकूण किंमत सुमारे ४०० कोटी रुपये होती. कंपनीचे समभाग मूल्य प्रति शेअर १०.५४ टक्क्यांच्या वाढीसह १५७.५० रुपयांवर व्यवहार करत आहे. मागील दोन क्वार्टर्समध्ये तब्बल १९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.


 
Powered By Sangraha 9.0