'SEBI' आणि 'SAT' सावध राहा; काय म्हणाले सरन्यायाधीश!

04 Jul 2024 16:12:36
chief justice of india sebi sat


नवी दिल्ली :   
   देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(SEBI) आणि सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल(SAT) या दोन्ही नियामक संस्थांना सावधानतेचा सल्ला दिला आहे. नवीन सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्युनल (SAT) संकुलाचे उद्घाटन करताना जास्त व्यवहार आणि नवीन नियमांमुळे कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचा विचार करावा असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिला आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही शेअर बाजारात जितकी गती पाहाल, तितकी सेबी आणि सॅटची भूमिका अधिक असेल असा माझा विश्वास आहे. या संस्था सावधगिरी बाळगतील, बाजारातील तेजी अनुभवतील पण त्यांचा पाया स्थिर राहील याचीही काळजी घेतील, असा विश्वास चंद्रचूड यांनी व्यक्त केला आहे.




दरम्यान, बाजार नियामक सेबी आणि सॅटला शेअर बाजारातील लक्षणीय वाढीदरम्यान सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देताना संस्थांचा पाया स्थिर सुनिश्चित करण्यासाठी न्यायाधिकरण खंडपीठांना पाठिंबा दिला आहे. तसेच, बाजारातील वाढत्या देवाणघेवाणीमुळे कामाचा आवाका वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.

मुंबई शेअर बाजाराने ८० हजारांचा टप्पा ओलांडला असून अशा घटनांमुळे नियामक प्राधिकरणांनी संतुलन आणि संयम राखला पाहिजे. याच पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी सेबी, सॅट या प्राधिकरणांना दिलेला सावधतेचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 'सॅट'चे पीठासीन अधिकारी न्यायमूर्ती पी.एस. दिनेश कुमार म्हणाले की, 'सॅट'मध्ये १,०२८ अपील प्रलंबित असून १९९७ स्थापनेपासून आतापर्यंत ६,७०० हून अधिक अपील निकाली काढल्या आहेत.




Powered By Sangraha 9.0