नवी दिल्ली : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यात एका टेम्पो चालकाने मानसिकदृष्ट्या कमकुवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद नदीम असे आरोपीचे नाव असून तो हल्दवानी येथील वनभुलपुरा भागातील रहिवासी आहे. बलात्कारानंतर हिंदू पीडितेला तोंड बंद ठेवण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून नदीमला अटक केली आहे. दि. २८ जुलै रोजी घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त करत हिंदू संघटनांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार ही घटना कोतवाली हल्द्वानी परिसरात घडली असून १६ वर्षीय पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या कमकुवत असून संगीत शिकण्यासाठी ती दररोज ऑटोने जात असे दररोज प्रमाणे रविवारी ती मंगलपाडव नावाच्या ठिकाणी रस्त्यावर ऑटोसाठी उभी होती. तेवढ्यात टेम्पो चालक नदीम तेथे आला त्याने पीडितेला संगीताच्या वर्गात सोडण्याचे आश्वासन दिले आणि तिला टेम्पोमध्ये बसवले. त्यानंतर ही हिंदू विद्यार्थिनी त्याच्या वासनेची शिकार बनली.
याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकून मोहम्मद नदीमला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५१(२)(३), ६४(२)के, ६५(१) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम ३/४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली असून या घटनेवर हल्द्वानीच्या हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोहम्मद नदीमवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी प्रशासनाकडून व्यक्त केली आहे.