इतिहासातील सर्वांत कमी एनपीए, सारस्वत बँकेने केला ८२ हजार कोटींचा टप्पा पार
31-Jul-2024
Total Views |
मुंबई : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेने एकूण नफा जाहीर केला आहे. बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सांगितले की, सारस्वत बँकेने ८२ हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. सहकार क्षेत्रात अग्रणी असलेली सारस्वत बँकेची सर्वसाधारण सभा २७ जुलै रोजी प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यासंकुल, दादर(पूर्व) येथे पार पडली.
बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर म्हणाले, बँकेने ८२ हजार कोटी रुपयांचा व्यावसायिक टप्पा पार केला असून मार्च २०२४ पर्यंत बँकेने ८२,०२४.७७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. ते पुढे म्हणाले, यात ४९,४५७.३१ कोटी रुपये ठेवींच्या स्वरूपात ३२,५६७.४६ कोटी रुपये कर्जाच्या रुपात समावेश असल्याचेही ते म्हणाले.
सारस्वत बँकेचा एकूण नफा ७८६.४३ कोटी रुपये तर करोत्तर नफा ५०२.९९ कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी ३५१ कोटी रुपये होता. बँकेच्या म्हणण्यानुसार १०६ वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च निव्वळ नफा आणि नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील ऐतिहासिक आकडा आहे.
बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या वर्षासाठी इक्विटी शेअर्सवर १७.५०% लाभांश घोषित केला आहे. बँकेने केवळ तिच्या मालमत्तेची गुणवत्ता आणि नफा लक्षणीयरीत्या सुधारला नाही तर आर्थिक गुणोत्तर देखील मजबूत केले आहेत. सारस्वत बँक नफा कमावणारी आणि लाभांश देणारी बँक असून महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या सहा राज्यांमध्ये सुमारे ४५०० कर्मचाऱ्यांसह ३०२ शाखा आहेत.