हमासचा म्होरक्या इस्माईल हानियाचा खात्मा; इस्त्रायली लष्काराचा हात?

31 Jul 2024 18:45:52
hamas-chief-ismail-haniyeh-killed


नवी दिल्ली :        इराणमधील मोठ्या हल्ल्यात हमासचा नेता इस्माईल हानियाचा खात्मा करण्यात आला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्पनेही आपल्या निवेदनात या वृत्तास दुजोरा दिला आहे. आयआरजीसीच्या निवेदनात म्हटले आहे की, तेहरानमधील हानियाच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्याचा एक अंगरक्षक मारला गेला. या हल्ल्यामागे इस्रायली लष्कराचा हात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, दहशतवादी संघटना असलेल्या हमासचा म्होरक्या इस्माईल हनियाची तेहरानमध्ये ज्या घरात हत्या करण्यात आली होती, त्या घरात इस्रायलने एप्रिलमध्ये त्याच्या तीन मुलांचाही खात्मा केला आहे. इस्त्रायली सैन्याने तेहरानमधील त्याच्या निवासस्थानाला लक्ष्य करत हमास प्रमुख इस्माइल हानिया आणि त्याचा एक अंगरक्षक ठार झाला, असे आयआरजीसीच्या निवेदनात म्हटले आहे.

आयआरजीसीच्या जनसंपर्क विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हल्ला दि. ३१ जुलै २०२४ रोजी पहाटे करण्यात आला. या घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून हमासने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पॅलेस्टिनी गटाचे नेते इस्माईल हानिया यांची तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी 'इस्त्रायली' हल्ल्यात हत्या करण्यात आली.


 
Powered By Sangraha 9.0