टोयोटा करणार २० हजार कोटींची गुंतवणूक! महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरणारा प्रकल्प

31 Jul 2024 12:34:46
 
Toyota
 
मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्रात २० हजार कोटींची गुंतवणूक करणार असून महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. या प्रकल्पामुळे हजारों लोकांना नोकरी उपलब्ध होणार आहे.
 
बुधवार, ३१ जुलै रोजी टोयाटो किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेडसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करार करण्यात आला. याद्वारे राज्यात २० हजार कोटींची गुंतवणूक येणार असून ८ हजारांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार आहे.
 
हे वाचलंत का? -  मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ मनसैनिकांवर गुन्हा दाखल! दोघांना अटक
 
या करारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, किर्लोस्कर मोटर्सच्या उपाध्यक्ष मानसी टाटा, टाटा किर्लोस्करचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशीमुरा, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते.
 
 
Powered By Sangraha 9.0