ब्रेकींग न्यूज! पूजा खेडकरची युपीएससी उमेदवारी रद्द!
31-Jul-2024
Total Views |
मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. युपीएससीकडून हा निर्णय घेण्यात आला असून यापुढे भविष्यात पूजा खेडकर यांना कुठलीही युपीएससीची परीक्षा देता येणार नाही. यूपीएससीकडून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पार पडली. न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला असून गुरुवारी ४ वाजता हा निर्णय देण्यात येणार आहे. मात्र, आता या त्याआधीच यूपीएससीने पूजा खेडकर यांच्यावर कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांची यूपीएससीची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. नागरी सेवा परिक्षा नियम २०२२ नुसार पूजा खेडकर यांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यानुसार पूजा खेडकर यांना भविष्यात कुठलीही परिक्षा देता येणार नाही.
पूजा खेडकर यांनी नाव बदलून अनेकवेळा यूपीएससीची परिक्षा दिली होती. तसेच त्यांनी खोटं अपंगत्व प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेटही सादर केले होते. नोकरीवर रुजू झाल्यावर त्यांनी अवाजवी मागण्या केल्या होत्या. त्यामुळे त्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या.