इम्तियाज जलील यांच्या घरी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी! चर्चांना उधाण

31 Jul 2024 11:16:25
 
Imtiaz Zalil
 
छत्रपती संभाजीनगर : एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरी विविध पक्षांच्या नेत्यांनी भेटीगाठी घेतल्या आहेत. मंगळवारी रात्री इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी या नेत्यांनी भेट दिली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.
 
राज्यातील विधानसभा निवडणूकीला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच आता शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार, स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी आणि नुकताच शरद पवार गटात प्रवेश करणारे बाबाजानी दुर्रानी यांनी इम्तियाज जलील यांच्या घरी त्यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे राजकीय समीकरण बनणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0