क्लीन अप मार्शलकडून ४२ हजार जणांवर कारवाई!

    31-Jul-2024
Total Views |
Clean-up marshals bmc
मुंबई : मुंबई महापालिकेने नियुक्त केलेल्या क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. दरम्यान क्लीन अप मार्शलनी २२ प्रभागात तब्बल १ कोटी २३ लाख रुपयांची वसुली करत ४२ हजार जणांवर कारवाई केली आहे. यातील सर्वाधिक अस्वच्छता पसरवणारे चर्चगेट, सीएसएमटी,दादर, कफ परेड इत्यादी भागात सापडले.
महापालिकेकडून सध्या २४ पैकी २२ प्रभागात क्लीन अप मार्शल नेमलेले आहेत. मात्र के पश्चिम आणि पी उत्तर प्रभागात कंत्राटदार कंपन्यांनी माघार घेतल्याने तेथील कारवाईचे काम ठप्प आहे. त्यामुळे या मार्शलची नियुक्ती खासगी संस्थांच्या माध्यामातून केल्याचे कळते. महापालिकेकडून २२ प्रभागात २ एप्रिलपासून अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कारवाईला सुरुवात झाली. ज्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून १०० रुपये ते १ हजार रुपयांचा दंड आकारला जातो. या दंडात्मक कारवाईच्या ५० टक्के महसूल महापालिकेला मिळतो.
कारवाईचा प्रकार आणि दंडाची रक्कम
कचरा फेकणे- २०० रु
थुंकणे- २०० रु
उघड्यावर स्नान - १०० रु
उघड्यावर लघुशंका- २०० रु
वाहने धुणे - १००० रु
शौच करणे - १०० रु
भांडी धुणे - २०० रु
अनिर्देशित जागेत प्राणी आणि पक्ष्यांना खाऊ घालणे - ५०० रु
विभाग- कारवाई संख्या - दंडाची रक्कम
ए प्रभाग - १३ हजार २१९ - २७ लाख
जी दक्षिण प्रभाग - ३ हजार ८७ - ७ लाख १३ हजार ७०० रुपये
* आर मध्य
बोरिवली पश्चिम - २ हजार ७६६ - ११ लाख
मुलुंड पश्चिम - १५९ - १ लाख १८ हजार ५०० रुपये