'लव्ह जिहाद'चे आणखी किती बळी जाणार?

30 Jul 2024 21:52:18
uran yashshree shinde love jihad


तिचा चेहरा चिरडून तिच्या छातीवर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. रात्रभर तिचे शव त्या सुमसान जागी पडून राहिले. भटक्या कुत्र्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडले. उरणची यशश्री शिंदे... दुःख, संताप आणि शब्दांत व्यक्त न होणार्‍या भावना मनात घर करून आहेत. बौद्ध समाजाच्या लेकीचा निर्घृण खून त्या नीच दाऊद शेखने केला. ‘लव्ह जिहाद’च्या या घटना थांबणार तरी कधी? या सगळ्यांचा अत्यंत दुःखद मानसिकतेने घेतलेला मागोवा...

‘लव्ह जिहाद’चा बळी ठरलेल्या यशश्रीच्या खुन्याला काय सजा होणार? याआधीही चेंबरच्या बौद्ध समाजाच्या रूपाली चंदनशिवेचा गळा चिरून इकबाल शेखने खून केला. मानखुर्दच्या मातंग समाजाच्या पूनम क्षीरसागरला मारून पोत्यात भरून नवाब खानने फेकून दिले. ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरलेल्या या निष्पाप मुली! आमच्या शोषित-वंचित समाजाच्या लेकीबाळींना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवणारे हे नराधम. यथावकाश या नराधमांच्या केसेस न्यायालयात चालतील. ‘तारीख पे तारीख’ चालेल. पण, ‘लव्ह जिहाद’ भस्मासुरामुळे कुठपर्यंत समाजाच्या लेकीबाळी अशा हकनाक मरतील? या सगळ्या घटना मानवतेला काळिमा फासणार्‍या आहेत. काय वाटत असेल यशश्रीच्या आईबाबांना? आईबाबांना सोडाच, आपण विचार केला तर? लेक कुणाही आईबाबांची लाडकीच असते. तिचे संगोपन, तिची काळजी, तिची सुरक्षा यामध्ये सगळे कुटुंब 24 तास तैनातच असते. ते नराधम कोवळ्या वयातल्या मुलींपर्यंत पोहोचतात आणि तिचा घात करतात. सर्वनाश करतात. यशश्रीच्या बाबतीत तरी काय वेगळे होते. यशश्रीच्या पित्याचे म्हणणे की, ज्यावेळी यशश्री 14-15 वर्षांची होती, त्यावेळी दाऊद शेखने तिच्याशी अश्लील कृत्य केले होते. यशश्रीचे आईवडील काय कोणत्याही पालकांसाठी हे सगळे फार भयंकरच.

14-15 वर्षांची पोर तिला काय कळत असणार? पण, दाऊदसारख्या नराधमांसाठी नुकतीच जन्माला आलेली बालकेही शोषणासाठीच असतात, असे वाटते, जगभराच्या घटनांतून दिसते. विचार करा, 14 वर्षांची मुलगी किती मोठी असेल? तर, त्यावेळी म्हणजे 2019 साली यशश्रीसोबत वाईट कृत्य केले म्हणून दाऊद याच्यावर ‘पॉक्सों’तर्गत गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी पकडले. तुरुंगातून सुटल्यावर तो कर्नाटकमध्ये गेला. मात्र, मुलींच्या निष्पाप आणि करुण भावनांशी कसे खेळायचे, फसवणे आणि घात करणेे, हे या राक्षसांना शिकवावे लागत नाही. त्यामुळेच त्याने तुरुंगातून सुटून पुन्हा यशश्रीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. घडणार्‍या घटनेतून अंदाज येतोच की त्याला यशश्रीशी संपर्क साधून माफी मागण्याचे नाटक करायचे असेल. चूक झाली. प्रेम होते आणि त्यामध्ये वेडे होऊन तसे वागलो. पण, माझे प्रेम आहे वगैरे वगैरे म्हणायचे असेल. त्या दाऊदने तिला पटवून द्यायचा प्रयत्न केला असता की, तिच्यावरच्या प्रेमाखातर त्याने तुरुंगवासही भोगला. प्रेमामध्ये त्याने खूप त्रास सहन केला. ‘सच्चा प्यार हैं इसलिए’ वगैरे वगैरे त्याला खोटेच म्हणायचे असेल. त्याच्या गोड बोलण्यावर यशश्रीने विश्वास ठेवायलाच हवा, असा त्याचा दुराग्रह असणार. त्याला वाटले की, या सगळ्यामुळे यशश्रीला नक्कीच वाटणार की, अरेरे आपल्यावर इतके खरे प्रेम करतो. बिचारा. तिच्या मनात त्याच्याबद्दल दयाभाव, करुणा आणि कदाचित प्रेमही उत्पन्न होण्याचा तो क्षण होऊ शकतो, असा त्याचा अंदाज असेल. दाऊदला माहिती होते की, कायद्याने ती सज्ञान झाली होती.

कायद्याने त्याला भेटण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर कुठेही जाण्यासाठी तिला कोणी रोखू शकत नव्हते. मागच्या वेळेसारखे त्याच्यावर ‘पॉक्सो’चा गुन्हा दाखल होणार नव्हता. ती भेटली की, तिला फूस लावायची. एकदा जाळ्यात सापडली की मग ‘पॉक्सो’ची केस टाकलेल्या यशश्री आणि यशश्रीच्या आईबाबांना चांगलाच धडा मिळेल, असे त्याला वाटले असेल. यशश्रीने त्याच्या या सगळ्या विकृत स्वप्नांवर पाणी फेरले. त्यामुळे दाऊद चवताळला. यशश्री त्या नराधमाच्या जाळ्यात अडकली नाही. त्यामुळेच त्याने यशश्रीचा खून केला. मैत्रिणीकडून परतताना दाऊदने तिला गाठले. तिच्यावर हल्ला केला. चेहरा छाती आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राने वार केला. यशश्रीने श्वास सोडला. नुसते लिहितानाही संताप, दुःख आणि हो, तितकीच हतबलताही वाटते. यशश्रीने त्या दाऊदला साथ दिली नाही म्हणूनच त्याने तिचा निर्घृण खून केला. नकार देणे हा यशश्रीचा गुन्हा होता का? तिला संविधानाने दिलेले अभिव्यक्तिस्वातंत्र्य नव्हते का? की यशश्री शिंदे नावाच्या मुलीशी आपण काहीही केले तरी खपून जाईल, असे त्या दाऊदला वाटले.

दुसरीकडे समाजाच्या मुलीची इतकी निर्घृण हत्या झाल्यावर ते ‘जय भिम, जय मिम’ बोलणारे तोंडात गुळणी घेऊन बसलेत का? की गुन्हेगार मुस्लीम आहे, हिंदू नाही म्हणून त्यांना यशश्रीच्या खुनामध्ये रस नाही. रस, हो रसच! कारण, मरणार्‍या आणि मारणार्‍याचा जाती-धर्म पाहूनच हे असले लोक पुढे येऊन उर बडवतात. दर्शन सोळंकीच्या हत्येतही जेव्हा हत्यारा अरमान आहे हे कळले, त्यावेळी त्या सगळ्या तथाकथित रॅडिकल, पुरोगामी आणि निधर्मीवाल्यांच्या गोटात सामसूम झाली. आताही यशश्रीच्या बाबतीत तेच आहे. मात्र, यशश्रीची जात, धर्म कोणताही असू दे, ती कोणाची तरी लेक होती. तिचा असा निर्घृण खून करणार्‍याला आणि त्याला मदत करणार्‍यांना शिक्षा व्हायलाच पहिजे.

छे, आजही अनेक मुली, ‘मेरावाला वैसा नही’च्या भ्रमात आहेत. या मुलींनी घरात आणि नातेवाईकांमध्ये केवळ चांगले लोक पाहिले आहेत. त्यामुळे षड्यंत्र रचत गोड बोलणारा आणि खोटी काळजी घेणारा कितीही दुष्ट असेल आणि मनात पाप ठेवून असेल, तरी या मुलींना ते समजत नाही. काय चांगलं, काय वाईट हे कोण कसे सांगणार? ‘ना जमी मिली ना फलक मिला’च्या भयंकारितेत या मुली फसत चालल्या आहेत. शाळा, महाविद्यालये आणि घर याव्यतिरिक्त सोशल मीडिया त्यातही मोबाईलच्या जाळ्यात अडकलेल्या मुली आणि मुलेही. याबाहेरही जग आहे आणि इथे सगळेच चांगले नाही, असे यांना कळणे आवश्यक आहे. या घटना का घडत असतील? जीव घेणार्‍या किंवा घेऊ शकणार्‍या व्यक्तीसोबत मुली का संपर्क ठेवत असतील. तर, स्पष्टच आहे की, भावनिक आधार त्या शोधतात. खूप वेळा मुलींना फ्री शॉपिंग, लाँग ड्राईव्हच्या माध्यमातून ड्रग्ज आणि सेक्सचे व्यसन लावले जाते. हे सगळे खूप वाईट आहे, पण सत्य मांडायला हवेच.

मुलगी वयात येत असतानाच तिच्या निर्मळ मनावर, शरीरावर आघात करावा म्हणून कुणीही आईबाबा मुलीला जन्माला घालत नाहीत. त्यामुळेच धर्मसंस्कार आणि सध्याचे वास्तव याबाबत मुलांना आईबाबांनी किंवा पालकांनी सांगायलाच हवे. तेही मोठे झाल्यावर त्यांना आपोआप कळेल, याची वाट न बघता अगदी कोवळ्या वयात सांगायला हवे. लेकीच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी, भवितव्यासाठी गुंतवणूक करतोच ना? आता वेळ आली आहे, तिच्या शारीरिक आणि त्यासोबतच भावनिक सुरक्षिततेच्या गुंतवणुुकीची. शाळांमध्ये ‘बॅड टच, गुड टच’ शिकवतात म्हणे. पण, आता वेळ आली आहे की, ‘बॅड पीपल, गुड पीपल’ शिकवण्याची. लव्ह जिहादच्या घडलेल्या घटना या मुलामुलींना सांगण्याची. काही लोक म्हणत असतात की, गुन्हेगारांना धर्म नसतो.

गुन्हेगारांचा धर्म नका सांगू, पण समाजाच्या मुलामुलींवर ‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’च्या माध्यमातून होणारे अत्याचार करणार्‍याची सत्य ओळख तर सांगूच शकतो ना? हकनाक मरणार्‍या त्या निष्पाप मुली आणि त्यांची कू्ररपणे हत्या करणारे ते राक्षस, या दोघांचीही नावे तर सांगूच शकतो ना? मात्र, तरीही वाटते की, ते त्यांच्या मुलांवर काय संस्कार करतील, काय शिकवत असतील, हा त्यांच्या पारड्यातला मुद्दा आहे. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो, काय सांगतो, भावनिकरित्या त्यांच्याशी किती सौहार्दपूर्ण संपर्क आणि संवाद आहे, हा मुद्दा आपल्या पारड्यातला आहे. तसेच आता समाजाला सामुदायिक पालकत्वाची गरज आहे. एखाद्याची मुलगा-मुलगी अशी फसत असेल, तर समाजाने सामुदायिकरित्या याबाबत भूमिका घ्यावी. त्याची मुलगी/मुलगा आहे ना, बघेल तो अशी वृत्ती सोडून द्यावी. समाज म्हणून संघटित सजग पालकत्व आता आजपासून उभे करूया. कदाचित, उद्या पुन्हा कोणी यशश्री असे मरणार नाही.


समाज काय म्हणतो?

‘ड्रग्ज जिहाद’ आणि ब्लॅकमेलिंगच्या षड्यंत्रातून ‘लव्ह जिहाद’च्या घडणार्‍या घटनांबाबत हजारो लोकांशी बोलले असेन. सगळ्यांचे म्हणणे की, सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करायला हवाच. ज्याची लेक मरते, ज्याची लेक पळून जाऊन नरकासारखे जगणे जगते, त्याला विचारा कसे वाटते! ‘लव्ह जिहाद’चा बळी ठरलेल्या मुलीचे आईबाबा मरेपर्यंत मुलीच्या वियोगाची सजा भोगतात. या पार्श्वभूमीवर गुन्हेगाराच्या आईबापाचे, पालकांचे काय? त्यांनाही शासन व्हायला हवे. कारण, त्यांनी त्यांच्या मुलाला मानवतेचे संस्कार दिले नाहीत. एखादा माणूस काय एका क्षणात राक्षसी कृत्य करतो? नाही, त्याच्यात ते संस्कार रूजतात. आपला मुलगा कस वागतो? काय करतो? हे न पाहणारे आईबाबाही गुन्हेगारच! त्यामुळे गुन्हेगार मुलासोबत त्याच्या आईबाबांलाही सजा व्हायलाच हवी. त्यांची मालमत्ता जप्त करायला हवी. घरादारावर बुलडोझर फिरवायला हवा. त्यामुळे मुलाने काही गैरकृत्य केले, तर आपल्यालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, हे जोपर्यंत आईबाबांना कळणार नाही, तोपर्यंत ते त्यांच्या त्या पोरांकडे नीट लक्ष देणार नाहीत. एक कळी उमलण्याआधीच अशी चिरडली तर जाणार नाही!
9594969638
Powered By Sangraha 9.0